Konkani Center Dainik Gomantak
गोवा

Konkani Center In Pune: पुण्यात पहिल्या कोकणी केंद्राची स्थापना, भाषा अभ्यासकांना होणार लाभ

First Konkani Center In Pune: या केंद्राच्या मार्फत कोकणी शिक्षण व प्रशिक्षण वर्ग घेण्याचे नियोजन आहे.

Pramod Yadav

First Konkani Center In Pune

पणजी: प्रगतीपथ एज्युकेशनल फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या मिलेनियम नॅशनल स्कूलतर्फे पुणे शहरामध्ये कर्वेनगर येथे कोकणी भाषा व कला केंद्र या नावे कोकणी भाषा व संस्कृतीचे संवर्धन करणारे पहिलेच केंद्र स्थापन झाले आहे.

१९ मार्च रोजी या केंद्राचे उदघाटन केंद्राचे अध्यक्ष गोव्यातील लेखक तथा प्राचार्य डॉ. भूषण भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक अन्वित फाटक, केदार वाळिंबे, केंद्राचे सदस्य, गोव्यातील लेखक तथा गायक डॉ. पूर्णानंद च्यारी, लीना भट (बा. भ. बोरकर यांची नात) पुणे, प्राची नवाथे आणि मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भावे यांनी, प्रगतीपथ एज्युकेशनल फाऊंडेशनचे संस्थापक वैदेही सुधीर फाटक यांच्या कोकणी भाषेच्या विकासाबद्दलच्या स्वप्नाविषयी माहिती सांगितली. त्यांचे सुपुत्र अन्वित फाटक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या या केंद्रामुळे ते स्वप्न साकार होईल, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात एका कोकणी दालनाचे उदघाटन करण्यात आले. या दालनामध्ये ‘कीर्ती मंदिर’ या नावे कोकणी भाषा, साहित्य व संस्कृतीसाठी विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यावेळी डॉ. पूर्णानंद च्यारी, लीना भट यांचीही भाषणे झाली. मिलेनियम नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना प्रश्न विचारून परिसंवादात भाग घेतला. सूत्रसंचालन प्राची नवाथे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT