Sindhudurg: नऊ महिन्यानंतर तिलारी घाटातून धावली 'लालपरी'; कोल्हापूर, दोडामार्ग ते पणजी बससेवा पूर्ववत

Tillari Ghat ST Bus Service: घाटातील रस्त्याची डागडुजी केल्यानंतर मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
Dodamarg- Sindhudurg
Tillari Ghat ST Bus ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

दोडामार्ग: गेल्या नऊ महिन्यापासून तिलारी घाटातून बंद असणारी एसटी सेवा अखेर बुधवारी (०२ एप्रिल) सुरु झाली. कोल्हापूर, दोडामार्ग ते पणजी मार्गे धावलेल्या या बसमुळे प्रवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिलारी घाटातून अवजड वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने बस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

तिलारी घाटातून वाहतूक बंद ठेवण्याबाबतचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानतर अवजड वाहनांसोबत एसटी वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. यामुळे या भागातील नियमित प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला विशेषत: शाळकरी मुलांची प्रवासासाठी तारांबळ उडत होती.

दरम्यान, विविध संघटना पुढाकार घेत एसटी सेवा सुरु करण्याची मागणी करत होत्या. दरम्यान, घाटातील रस्त्याची डागडुजी केल्यानंतर मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Dodamarg- Sindhudurg
Mandovi Hotel Panjim: नेहरु, इंदिरा गांधी, वाजपेयींनी मुक्काम केलेले पणजीतील ऐतिहासिक मांडवी हॉटेल बँक घेणार ताब्यात

तिलारी घाटातील संरक्षक कठडे तुटल्याने मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. संरक्षक कठडे पुन्हा बांधून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच, बंद ठेवण्यात आलेले बससेवा देखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे. बुधवारी कोल्हापूर - दोडामार्ग - पणजी जाणारी बसचे विविध ठिकाणी प्रवाशांनी जंगी स्वागत केले.

गेल्या नऊ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेल्या बससेवेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर बससेवा सुरु झाल्याने प्रवाशांचा दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com