Charter flights will start again in goa Dainik Gomantak
गोवा

Charter Plane Arrived in Goa : यंदाच्या हंगामातील पहिलं चार्टर प्लेन गोव्यात दाखल

गोव्यात पावसाळा संपताच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. सणासुदीचं निमित्त साधत देशविदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल होऊ लागले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Charter Plane Arrived in Goa : गोव्यात पावसाळा संपताच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. सणासुदीचं निमित्त साधत देशविदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. राज्यातील जवळपास सर्वच हॉटेल, रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल झाली आहेत. अशातच पहिलं आंतरराष्ट्रीय चार्टर प्लेनही आज गोव्यात दाखल झालं आहे. (Charter Plane Arrived in Goa)

गोव्याचा यंदाचा पर्यटन हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरु होतो. यंदा लांबलेल्या पावसामुळे काहीसा उशिराच पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. त्यातच आज कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल झालं आहे. आज सकाळीच 180 पर्यटक आणि 9 क्रू मेंबर्सना घेऊन हे चार्टर प्लेन दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं.

मंत्री माविन गुदिन्हो यांनी विमानतळावर जात परदेशी पाहुण्यांचं गोव्यात स्वागत केलं. यावेळी काही अधिकारीही गुदिन्हो यांच्यासह विमानतळावर उपस्थित होते. पारंपरिक ब्रास बँडच्या गजरात पर्यटकांचं स्वागत करण्यात आलं आहे. गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु झाल्यावर आता दर आठवड्याला एक चार्टर विमान कझाकस्तानहून गोव्यासाठी झेपावणार आहे. यासोबतच चार्टर विमानसेवा पुरवणाऱी कंपनी एरोफ्लॉट आठवड्याला तीन विमानं रशियाहूही सुरु करण्याच्या विचारात आहे. 3 नोव्हेंबरपासून ही विमानसेवाही सुरु होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

PM Viksit Bharat Rojgar Yojana: काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? तरुणांना कसे मिळणार 15,000 रुपये? PM मोदींची घोषणा

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

SCROLL FOR NEXT