Goa Road Accidents : गोव्यातील रस्ते मृत्यूचे सापळे; महिन्याकाठी 20 अपघाती बळी

गोव्याची वाहनसंख्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याने छोट्या राज्यात गेल्या नऊ महिन्यांत दररोज सुमारे आठ अपघातांची नोंद झाली आहे.
Damaged Road in Goa
Damaged Road in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Road Accidents : गोव्यातील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत कारण या वर्षाच्या जानेवारी ते सप्टेंबर या पहिल्या नऊ महिन्यांत दर महिन्याला सरासरी 20 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. गोव्याची वाहनसंख्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याने छोट्या राज्यात गेल्या नऊ महिन्यांत दररोज सुमारे 8 अपघातांची नोंद झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ते विभाग (PWD), गोवा पोलिसांचा वाहतूक कक्ष आणि परिवहन संचालनालय यांनी पुढील पंधरवड्यात गोव्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम हाती आहे. गोव्यात चालू वर्षात नोंदलेल्या अपघातांपैकी 56 टक्के अपघात हे चालकाच्या चुकांमुळे झाले आहेत. यावर्षी 1 डिसेंबरपासून योजना तयार करण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. रस्ता सुरक्षा ओपन पब्लिक फोरममध्ये प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम खात्याने विभागाने अंतरिम उपायांवर काम सुरू केले आहे. गोव्यातील रस्त्यांवरील रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तीनही विभाग लवकरच एकत्रितपणे चर्चा करणार आहेत.

Damaged Road in Goa
Goa Dairy : दिवाळी उलटूनही गोवा डेअरीकडून थकबाकी नाहीच; दूध उत्पादकांमध्ये नाराजी

आप कार्यकर्त्या सेसिल रॉड्रिग्स यांनी गोव्यातील खराब रस्त्यांविरोधात वारंवार आवाज उठवला आहे. राज्यातील रस्त्यांवरील वाहतुकीची चिन्हे नियमितपणे अद्ययावत करणे आणि नूतनीकरण करणे आवश्यक आहे. तसंच पोलिसांना सार्वजनिक बांधकाम किंवा रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. जर एखादी दुर्घटना घडली तर पोलिसांनी संबंधितांना जबाबदार धरुन कारवाई केली पाहिजे, असे सेसिल म्हणाल्या. गोव्यातील रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर्सनाही रंगरंगोटी करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम खातं राज्यातील स्पीड ब्रेकर रंगवण्याचा आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल करार (AMC) करण्याचा विचार करत आहे, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डीसी गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com