Fire At Aguada Fort Dainik Gomantak
गोवा

Fire At Aguada Fort: आग्वाद किल्ला येथे लागली आग अन् पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला, पाहा व्हिडिओ

गोव्यात मागील महिन्यात सत्तरीपासून ते काणकोणपर्यंतच्या जंगलात आगींच्या घटना घडल्या.

Pramod Yadav

Fire At Aguada Fort:  गोव्यात मागील महिन्यात सत्तरीपासून ते काणकोणपर्यंतच्या जंगलात आगींच्या घटना घडल्या. या वणव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलातील वनसंपदा खाक झाली. राज्य सरकारने व्यापक प्रयत्न करून या आगीच्या घटना आटोक्यात आणल्या. भारतीय वायुसेना देखील यावेळी सरकारच्या मदतीला धावून आली, राज्यातील आगीची नोंद केंद्र सरकारने देखील घेतली.

दरम्यान, आग्वाद किल्ला येथे आग लागली अन् गोवा पोलिसांमुळे मोठा अनर्थ होता होता टळला. याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

गोवा पोलिस पॅट्रोलिंग करत असताना त्यांना आग्वाद किल्ला येथे मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, यावेळी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

यामुळे आगीचा पुढे विस्तार झाला नाही व मोठा अनर्थ टळला. उत्तर गोवा पोलिसांनी पोलिस कर्मचारी आग विझवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, गोव्यात अलीकडच्या काळात जंगलात आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या आगीमध्ये एकूण जवळपास 4.18 चौरस किलोमीटर वनक्षेत्र खाक झाले आहे.

केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार लुइझिन फालेरो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरातून ही माहिती दिली.

गेल्या महिन्यात राज्यभरात जंगलामध्ये आगीच्या 74 घटना घडल्या होत्या. गेल्या महिन्यात राज्यभरातील खाजगी जमीन, राखीव जंगले, कोमुनिदाद जमीन आणि संरक्षित भागात या आगीच्या घटना घडल्या होत्या.

यात तीन वन्यजीव अभयारण्यांमधील 2.27 चौरस किलोमीटर क्षेत्र बाधित झाले होते. त्यासह एकूण सुमारे 4.18 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आगीत खाक झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT