'मोपा ते मडगाव टॅक्सी भाडे 8000 रूपये?', प्रिय PM आणि गोवा CM एवढं करा... महिलेने केली विनंती

टॅक्सी व्यवसायिकांकडून आकारले जाणारे अवाजवी भाडे याबाबत वारंवार चर्चा झाली.
PM And Goa CM
PM And Goa CMDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa To Margao: गोव्यातील सार्वजनिक वाहतूक आणि टॅक्सीचा मुद्दा चगळून चोथा झालेला विषय आहे. याबाबत येणाऱ्या तक्रारी आणि सूचना यांचे भवितव्य क्षणभरासाठी राहते आणि कालांतराने विरून जाते. दरम्यान, उत्तर गोव्यात झालेल्या मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वाहतूक आणि टॅक्सीचा मुद्या चर्चेत आला, तेथून टॅक्सी व्यवसायिकांकडून आकारले जाणारे अवाजवी भाडे याबाबत देखील वारंवार चर्चा झाली. पण, हा मुद्दा अजूनही तसाच असल्याचे एका महिलेने केलेल्या ट्विटमुळे समोर आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने वंदे भारत ट्रेन बाबत एका बातमीचा स्क्रिनशॉट ट्विटरवरती शेअर करण्यात आला आहे. या बातमीत वंदे भारत ट्रेन कशा पद्धतीने भारतात निर्माण करण्यात आली व ती कशापद्धतीने अधुनिक बदलाचे प्रतिक ठरली आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या ट्विटचा दाखला देत मीनल फर्नांडीस नावाच्या महिलेने गोव्यातील टॅक्सीचा मुद्दा आधोरेखित केला आहे. "प्रिय पंतप्रधान आणि गोवा मुख्यमंत्री भविष्यासाठी मोपा ते मडगाव आणि काणकोण असा प्रवास करण्यासाठी फास्ट ट्रेन किंवा भूमीगत ट्रेनची सोय करा. वेगवान आणि कमी दरात ती लोकांसाठी उपलब्ध असेल. सध्या आम्ही यासाठी 8,000 हजार रूपये मोजतोय." असे ट्विट या महिलेने केले आहे.

महिलेने स्वत:ची ओळख होममेकर अशी करत हॅशटॅग वापरून मोदीभक्त आणि सुशेगाद गोंयकार असल्याचे तिच्या बायोमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, या महिलेच्या या ट्विटला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. "तुम्ही ही समस्या आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमची तक्रार नोंद केली असून, संबधित विभागाकडे पाठवली आहे." असे विमानतळ प्रशासनाच्या वतीने ट्विट करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com