Atal Setu  Dainik Gomantak
गोवा

Atal Setu : अटल सेतूवरील धोकादायक स्टंट 'त्या' पर्यटकांना भोवणार; गुन्हा दाखल

झुआरी पुलावरही वाहनांच्या रांगा, पर्यटक वाहने थांबवून छायाचित्रे काढताना दिसत आहेत

Rajat Sawant

Atal Setu : पणजीतील अटल सेतूवर काही पर्यटक धावत्या वाहनाच्या खिडकीतुन बाहेर येत सेल्फी घेत काही धोकादायक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दखल घेत पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

अटल सेतूवर कर्नाटक नोंदणीकृत कारमधील प्रवासी कारमधून खिडकीतुन बाहेर येत सेल्फी घेत काही धोकादायक स्टंट करत होते. ही घटना काही व्यक्तींनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली व सोशल मिडीयावर पोस्ट केली. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच या प्रकरणाची गंभीर दखल पणजी पोलिसांनी घेतली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपाल पणजी पोलिस करत आहेत.

तसेच काही चित्र झुआरी पुलावर दिसत आहे. झुआरी पुल वाहतुकीसाठी खुला होऊन 20 दिवस होत आले आहेत. पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने जुन्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. परंतु नवा पूल हे आता पर्यटनस्थळ बनले की काय? असे वाटू लागले आहे.

कारण चारचाकी वाहने घेऊन येणारे पर्यटक पुलावर वाहन थांबवून छायाचित्रे काढताना दिसत आहेत. हा प्रकार सध्या नित्याचाच झाला आहे.

पर्यटकांना पुलावरून छायाचित्रे काढण्याचा मोह आवरत नसल्याने हौसी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात.

विशेष बाब म्हणजे या रांगा पाहून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे ट्विट करीत राज्य सरकारच्या मंत्र्यांवर उपाहासात्मक टीका केली आहे. ते ट्विट सध्या समाज माध्यमांत चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

SCROLL FOR NEXT