Calangute Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कॉलगर्ल्सकडून मारहाण झालेला मध्यप्रदेशचा 'तो' माजी मंत्री भाजपचा? काँग्रेस विरोधात FIR दाखल

घटना उघड झाल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसने एका वृत्तपत्राचे कात्रण ट्विटरवर शेअर केले.

Pramod Yadav

मध्य प्रदेशातील एक नेता आणि त्याच्या दोन मित्रांना गोव्यात कॉलगर्ल्सनी बेदम मारहाण केली. नेता मध्यप्रदेशचा माजी मंत्री असल्याची माहिती समोर आली आहे. सहा मार्च रोजी कळंगुट येथील एका हॉटेलवरती ही घटना घडली.

दरम्यान, यावरून मध्यप्रदेश काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर भाजपने याप्रकरणी काँग्रेस विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.

घटना उघड झाल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसने एका वृत्तपत्राचे कात्रण ट्विटरवर शेअर केले. गोव्यात अय्याशी करणाऱ्या भाजप नेता आणि मध्यप्रदेशचे माजी मंत्री यांना कॉलगर्ल्सनी चप्पलने मारहाण केली. शिवराजची भाजप आता बेशर्म झाले आहे. असे ट्विट काँग्रेस कडून करण्यात आले.

त्यानंतर काँग्रेसने अजून एक ट्विट करत भाजपच्या FIR ची प्रत आणि दोन बातम्यांचे कात्रण शेअर केले आहे.

"कमलनाथ यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला आहे. पेपरची कात्रण प्रसिद्ध केल्याप्रकरणी भाजपने कांग्रेसच्या आयटी सेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे. तसेच, आता ते प्रसार माध्यमांचा आवाज देखील दाबण्याचा प्रयत्न करत आहेत."

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील एक नेता आणि त्याच्या दोन मित्रांसोबत फिरण्यासाठी गोव्यात आले होते. या नेत्याने एका दलालाच्या माध्यमातून मुंबईतून दोन कॉल गर्ल्स बोलावल्याचं सांगण्यात येत आहे. दलालाशी झालेल्या चर्चेपेक्षा कॉलगर्ल्स निर्धारित वेळेपूर्वी निघून जाऊ लागल्याने नेता आणि त्याच्या मित्रांचा कॉलगर्ल आणि दलालाशी वाद झाला.

पैसे देण्याची वेळ आली तेव्हा या नेत्याने दलालाच्या खात्यात ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर केल्याचे सांगितले. दरम्यान, रक्कम मला मिळालीच नाही, असे दलाल म्हणाला.

दरम्यान, हा फुकटचंद नेता व त्याचे मित्र हॉटेलच्या वरच्या मजल्यावर त्यांनी घेतलेल्या भाड्याच्या खोलीत जाऊन लपून बसले. कॉलगर्ल्सनी त्यांना शोधून काढले आणि बेदम चोप दिला. पैसे न देताच हॉटेलमधून पोबारा करण्याचा त्यांचा डाव होता. पण, कॉलगर्ल्सनी त्यांना चांगलाच चोप दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT