Bhausaheb Bandodkar : भाऊसाहेब बांदोडकर गोव्याच्या राजकारणातील मेरूमणी...

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे दयानंद बांदोडकर यांची आज जयंती आहे.
Bhausaheb Bandodkar Birth Anniversary
Bhausaheb Bandodkar Birth AnniversaryDainik Gomantak
Published on
Updated on

Bhausaheb Bandodkar Birth Anniversary : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे दयानंद बांदोडकर यांची आज जयंती आहे. ते गोव्यातील एक नामवंत उद्योगपतीही होते. त्यांचा जन्म गोव्यातील पेडणे गावातील एका सामान्य घरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण आणि आईच श्रीमंती. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे आणि माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण राजधानी पणजी येथे झाले. 

भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्तंभ होते, शिवाय बहुजन समाजाचे नैतृत्व करत असताना सर्व समाजाला एकत्रित घेवून कार्य केले. त्यांचे पुण्य कार्य आज कुणीही विसरू शकत नाही.

Bhausaheb Bandodkar Birth Anniversary
माया खरंगटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

गोव्याचा राजकीय इतिहास कमीच लिहिला गेला आहे. त्यातही विशिष्ट उद्दिष्ट तथेवून लिहिलेल्या इतिहासाचे प्रमाण कमी आहे.

19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त झाला. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी गोव्याने पंचायतीची पहिली निवडणूक अनुभवली असली तरी गोव्याचा खराखुरा राज्यकारभार चालवण्यासाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी विधानसभेची जी निवडणूक झाली ती 9 डिसेंबर 1963 रोजी. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचा मोठा हात होता. त्यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात होते. त्याच सरकारने लष्करी कारवाई करून गोव्याला मुक्ती मिळवून दिली. तेव्हा गोव्यात इतर पक्ष अस्तित्वात नव्हतेच.

6 मार्च 1963 रोजी महाराष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आणि 13 सप्टेंबर 1963 रोजी युनायटेड गोवन या पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेतृत्व भाऊसाहेब बांदोडकर करत होते. यांच्या नेतुत्वाखाली जरी निवडणूक लढवली गेली.

तरी त्यांनी ही निवडणूक लढवली नव्हती. तरीसुद्धा मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनाच मिळाली. त्याच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन आणि समाजकल्याण हि खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रातमध्ये समाविष्ट करणे होते.

भाऊसाहेबानी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत गोव्यामध्ये अनके सुधारणा केल्या. गोवा राज्याचा अधिक विकास व्हावा, म्हणून त्यांनीअनेक योजना आणि कार्यक्रम राबविले. शेती आणि मासेमारीकरणाऱ्याना प्रोत्साहन दिले.

गोव्यामधील उदयॊजकाना चालना दिली, ग्रामिक भागातील त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले , तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला, साहित्य आणि कलेला उत्तेजन मिळण्यासाठी राज्यात कला अकादमीची स्थापना केली.

त्यांच्याअनेक क्रीडासंबंधित संस्थाना सढळ हाताने मदत केली. कोणत्याही सामाजिक कार्याला ते सढळ हाताने मदत करत. थोर दानशूर म्हणून त्याचा लौकिक होता. क्रिकेट ,शिकार, वाचन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे पणजी येथे निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com