वास्को: मुरगाव पोलिसांनी (Margao) काँग्रेसचे (Congress) नेते संकल्प आमोणकर आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. बिहारमध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून तिथे नोंद झालेल्या गुन्ह्यानंतर आमोणकर यांच्या विरुद्ध मुरगाव पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish chodankar) यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारमधील एक मंत्री वासना कांडात असल्याची माहिती दिली होती.
नंतर त्या मंत्र्याचे वासना कांड संपूर्ण गोव्यात गाजत असताना बिहार राज्यातील बेट्टीया गावातील पोलीस स्थानकात एका महिलेने तक्रार देऊन गोव्यातील गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, यशवंत घोणसेकर, सोनू उर्फ प्रज्योत वेंगुर्लेकर, दामोदर दिवकर यांनी माझा गैरफायदा घेऊन पैशाचे आमिष दाखवून वासना कांडाची मोबाईल द्वारे व्हिडिओ शूटिंग काढून घेतले. तसेच मोबाईल वरील शूटिंग संगणकाच्या माध्यमातून यात छेडछाड केली. सदर त्या महिलेने तक्रार बिहारमध्ये केल्याने, तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण शून्य करून दक्षिण गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मंगळवारी रात्री 10.30 वाजता सदर त्या महिलेची तक्रार मुरगाव पोलीस स्थानकाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. सदर तक्रारीची दखल घेऊन मुरगाव पोलीस स्थानकाच्या निरीक्षक परेश नाईक यांनी संकल्प आमोणकर, यशवंत घोणसेकर, सोनू उर्फ प्रज्योत वेंगुर्लेकर, दामोदर दिवकर विरोधात एक महिलेचा गैरफायदा घेतला. तसेच पैशाचे आमिष दाखवणे, खंडणी वसूल करण्यासारख्या गुन्ह्याखाली प्रथम दर्शनीय गुन्हा (एफआयआर) नोंद केली आहे.
मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी बिहार बिट्टीया गावातील एका महिलेने आपला गैरफायदा घेऊन पैशाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रारीनुसार मुरगाव पोलिसांनी गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, यशवंत घोणसेकर, सोनू उर्फ प्रज्योत वेंगुर्लेकर, दामोदर दिवकर यांच्या विरोधात भा.द. स. 384, 120(बी), 354(डी) व माहिती तांत्रिक दुरुस्ती अंतर्गत 66- डी,67-अ गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरण गंभीर असल्याने मुरगाव पोलीस स्थानकावर मंगळवारी रीतसर बिहार राज्यातील त्या महिलेची तक्रार दाखल करण्यात आली. त्या महिलेच्या तक्रारीनुसार गैरफायदा घेणे, पैशाचे आमिष दाखवणे, खंडणी वसूल सारखे गुन्हे सध्या वरील संशयितांवर लावण्यात आले आहे. या संशयितापैकी एक काँग्रेसचा नेता असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक परेश नाईक करीत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.