प्रसाद गावकरांना काँग्रेस उमेदवारी देण्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध

कामत यांना निवेदन सादर करून गावकर याना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी न देता काँग्रेस पक्षाशी निगडित असलेल्या उमेदवारांना देण्याची मागणी केली.
Election

Election

Dainik Gomantak

Published on
Updated on

फातोर्डा : सांगे येथील काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांनी आज विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांची त्यांच्या भेट घेऊन अपक्ष आमदार प्रसाद गावकर (MLA Prasad Gaonkar) यांना सांगेत काँग्रेसची उमेदवारी देण्यास विरोध केला. कामत यांना निवेदन सादर करून गावकर याना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत (Election) काँग्रेस पक्षाची उमेदवारी न देता काँग्रेस पक्षाशी निगडित असलेल्या उमेदवारांना देण्याची मागणी केली.

<div class="paragraphs"><p>Election</p></div>
मुरगाव पालिका इमारतीच्या छप्पराला गळती लागून शेकडो कोविड अर्ज पाण्यात

यावेळी सांगेचे नगरसेवक संदेश कोसंबे , सांगे युथ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जार्वीस फेर्नांडीस व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य चंदा वेळीप व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना संदेश कोसंबे यांनी सांगितले कि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे कि सांगे मतदार संघाची उमेदवारी या उणेद्वारीसाठी इश्चुक असलेल्याना विश्वासात घेऊन देण्यात येणार आहे.

संगेचि उमेदवारी कोणाला हे अजून निश्चित झाले नाही . तसेच विद्यमान अपक्ष आमदार असलेले प्रसाद गावकर यांनी पाच वर्षापूर्वी या पक्षात का प्रवेश केला नाही असा प्रश्नही केला. तसेच जेरिएस फेर्नांडीस यांनी सांगितले कि आम्ही निष्टेने काम केलेल्या आणि इच्छुक असलेल्या कोणत्याही एकाला उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीने आम्ही काम करणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mokhard Sisters Death Case
Goa Rakshan Yatra News
Porvorim Elevated Road
Valpoi Stray Dogs Survey
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com