Santa Cruz Goa Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz Goa: अखेर सांताक्रुझ पंचायत घरांच्या पायाभरणीसाठी लागला मुहूर्त!

Santa Cruz Goa: सांताक्रुझ पंचायत घराची पायाभरणी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या हस्ते होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Santa Cruz Goa: बोंदीर-सांताक्रुझ येथील फुटबॉल मैदानाशेजारी वीस वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या जागेत स्वयंपूर्ण आत्मनिर्भर योजनेखाली सांताक्रुझ पंचायत घराचा पायाभरणी कार्यक्रम आज रोज दुपारी 12 वाजता स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या हस्ते होणार आहे.

गेल्या वीस वर्षांपासून पंचायत घरासाठी जमीन ताब्यात घेतली होती, पण त्याचे बांधकाम करण्यात आले नव्हते. या नव्या पंचायत घराचे काम बांधकाम खात्यातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच विनान्सिओ डॉमनिक परेरा यांनी दिली.

पंचायत घर व कम्युनिटी हॉलसाठी गेल्या 20 वर्षांपूर्वी पंचायतीने जागा ताब्यात घेतली होती. या जागेवर काही बेकायदेशीर अतिक्रमणे उभी राहिली होती ती काही दिवसांपूर्वी पंचायतीच्या मंडळाने हटविली. हे पंचायत घराचे बांधकाम सुमारे 3 हजार चौ. मी. जागेत होणार आहे. त्यासाठी योजनेखाली असलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बाजूला असलेल्या जागेत कम्युनिटी हॉलसाठीही प्रयत्न केले जातील, असे परेरा यांनी सांगितले.

सध्याची पंचायत कार्यालय हे कालापूर मार्केटमधील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर मासळी मार्केट असल्याने तसेच गजबज असल्याने पंचायतीमध्ये येणाऱ्या स्थानिकांना मुश्किलीचे होते. हे कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना वर चढून जाणेही कठीण होते. तेथे वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने ती दूरवर उभी करून ठेवावी लागतात.

‘बांधकाम वर्षभरात होणार पूर्ण’

पंचायतीवर निवडून आलेल्या नव्या पंचायत मंडळाने बेकायदा अतिक्रमणे तसेच बांधकामांविरुद्ध ठोस पावले उचलली आहेत. येत्या वर्षभरात नव्या पंचायत घराचे बांधकाम एका वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

सध्या सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेतले आहे व ज्या ठिकाणी कचरा भरदिवसा वा रात्री टाकला जातो तेथे सीसी टीव्ही कॅमेरेही लावण्याचा विचार आहे, असे उपसरपंच परेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT