Dr. Sushila Mendes | Goa Liberation Day
Dr. Sushila Mendes | Goa Liberation Day

Goa Liberation Day: 'रक्त न सांडता गोवा मुक्त झाला नाही' गोवा मुक्तीच्या विलंबाचा अभ्यास करा- सुशीला मेंडिस

Goa Liberation Day: गोवा मुक्तीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुशीला सावंत मेंडिस यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या भूमिकांवर प्रकाश टाकला.
Published on

Goa Liberation Day: देशाच्या स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षांचा कालावधी लागला. विलंबाने मिळालेल्या मुक्तीविषयी आजही राज्यात राष्ट्रीय नेत्यांना दोष दिला जातो, त्यावेळची सत्यस्थिती न जाणता किंवा त्याचा अभ्यास न करता दोष देण्यात स्वारस्य मानले जाते. त्यामुळे गोवा मुक्तीच्या इतिहास जाणून घेणे आवश्‍यक आहे, असे सांगत 62 व्या गोवा मुक्तीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर इतिहासाच्या प्राध्यापक डॉ. सुशीला सावंत मेंडिस यांनी गोवा मुक्तीवेळच्या स्थितीविषयीच्या राष्ट्रीय नेत्यांच्या भूमिकांवर प्रकाश टाकला.

दै. ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात डॉ. सावंत मेंडिस यांच्याशी गोवा मुक्तीत राष्ट्रीय नेत्यांची भूमिका या विषयावर सखोल चर्चा केली. त्या चर्चेचा हा सारांश. गोवा मुक्तीला विलंब झाल्याने आजही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना दोष दिला जातो, त्यावर मेंडिस म्हणतात, देश स्वतंत्र झाल्यानंतर गोवा, पाँडेचरीसारखी लहान राज्ये पारतंत्र्यातच होती.

देश स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान झालेल्या पंडित नेहरू यांच्यासमोर केवळ गोव्याचा विचार नव्हता, तर देशाची घडी बसविणे आवश्‍यक होते. त्यावेळी स्वातंत्र्यसैनिक निश्‍चित दुखावले होते. महत्त्वाची बाब म्हणजे नेहरू-गांधी यांना गोव्याच्या लोकांनी स्वातंत्र्य लढा उभारणे आवश्‍यक वाटत होते. त्यावेळी गोवा विमोचन सहायक समिती होती, त्यातील नानासाहेब गोरे, शिरुभाऊ लिमये, रामभाऊ तुपे, कर्नल सिंग अशा तिशीच्या आतील स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले.

पंडित नेहरू गोवा मुक्तीसाठी वावरले, पण मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग नव्हता. नेहरू हे शांततेच्या मार्गाने जाणारे होते, गोव्यातील सालाझार हा ‘टेबल टॉक’ करणारा व्यक्ती नव्हता. त्यामुळे हा प्रश्‍न चर्चेने सुटणारा नव्हता हे माहीत होते. 1946 मध्ये राम मनोहर लोहिया गोव्यात आल्यानंतर लोकांमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीची बिजे रोवली जाऊ लागली.

Dr. Sushila Mendes | Goa Liberation Day
Goa Liberation Day 2022: 'गोल्डन गोवा'; राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या मुक्तिदिनाच्या शुभेच्छा

तसेच, अनेक स्वातंत्र्यसैनिक निर्माण होऊ लागले, त्याच दरम्यान नेहरूंना अनेक शिष्टमंडळे जाऊन गोवा मुक्तीसाठीची मागणी करीत होते. याशिवाय वर्तमानपत्रांतूनही गोवा मुक्तीची मागणी लोक करीत होते. अनेक ठिकाणांहून लोकांची गोवा मुक्तीची मागणी होऊ लागली. त्यामुळे नेहरूंवर दबाव वाढत होता. त्यावेळचे संरक्षणमंत्री असलेल्या कृष्णा मेनन यांना गोव्यातील वसाहतवाद मोडीत काढायचा होता.

पोर्तुगीज लष्कराचा प्रमुख वासालो सिल्वा याची वेगळी स्वतःची कल्पना होती, हेही लक्षात घ्यायला हवे. दुसऱ्या बाजूला पंडित नेहरू असो किंवा कृष्णा मेनन यांच्‍यावर आजही टीका केली जाते, परंतु पंडित नेहरू यांना गोवा मुक्तीविषयी विचारणा केल्यावर आपण योग्यवेळी निर्णय घेऊ, असे पटवून सांगताना मेंडिस यांनी त्यासाठी काही दाखलेही दिले.

गोव्याच्या सीमावर्ती भागात ज्यावेळी भारतीय लष्कर पोहोचले, तेव्हा गोव्यात सालाझार किंवा इतर पोर्तुगीज लोक ‘सेव्ह गोवा’ची याचना चर्चमध्ये करू लागले होते. पोर्तुगीजांनी सात पूल बाँबद्वारे उडविले, त्यांनी लोकांचा संपर्क मोडीत काढला होता.

जेव्हा लष्कर गोव्यात आले, तेव्हा पोर्तुगीज सैनिक मारले गेले आणि भारतीय लष्करातील जवानही शहीद झाले. त्यामुळे हे स्वातंत्र्य रक्त न सांडता मिळाले असे म्हणता येणार नाही, असे सुशीला मेंडिस म्हणाल्या.

‘...पण काँग्रेसला सत्ता नाही’

काँग्रेसच्या काळात गोवा मुक्ती मिळाली, तर गोवा मुक्तीनंतर राज्याची सत्ता जनतेने काँग्रेसकडे सोपविली नाही. पुरुषोत्तम काकोडकर हे एकमेव आमदार होते आणि तेही दमणमधून निवडून आले होते, हेही लक्षात घेणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी डॉ. सुशीला मेंडिस यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com