Goa Parking Dainik Gomantak
गोवा

Goa Parking Issue : वाळपईत अखेर ‘नो पार्किंग’ फलक !

तरीही ऐन चतुर्थीत कोंडीची भीती : वाढती वाहनांची संख्या बनतेय डोकेदुखी

दैनिक गोमन्तक

Goa Parking Issue: वाळपई मुख्य बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या अधिकच सतावत आहे. यावर तोडग्यासाठी वाळपई पालिकेने याआधी अनेकदा वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यानुसार आता कार्यवाही हाती घेत वाळपई पोलीस स्थानक क्षेत्र ते पणजी मार्गावरील प्रथम दंडाधिकारी न्यायालयापर्यंत एक कि.मी. पर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग झोन’ असे सूचित करणारे फलक उभारले आहेत.

परंतु वाढती वाहनांची संख्या व शहरातील कमी जागा यामुळे ऐन चतुर्थीवेळी या निर्देशांचे पालन चालकांकडून होईल का, अशी विचारणा होत आहे.

कारण अरूंद जागेतून वाहने जात असतानाच त्यातच वाहन पार्किंग करणे, हे प्रकार वाढले तर सणावेळी वाहतूक कोंडीची भीती वाढली आहे. आजच्या घडीला प्रत्येक घरात लहान, मोठे असे किमान दोन तीन गाड्या असतात.

बेशिस्तपणावर ‘पे पार्किंग’चा उतारा

अवरलेडी, फातिमा कोन्वेंट, नेशनल हायस्कूल, युनिटी हायस्कूल या ठिकाणी रस्त्यालगत वाहने ठेवली जातात. त्यामुळे समस्या उद्‍भवते. यावर ‘पे पार्किंग’ हा चांगला उपाय ठरणार आहे, असे सुतोवाचही अनेकदा पालिका बैठकीत करण्यात आले होते. ‘पे पार्किंग’ केल्यास बेशिस्त पार्किंगला बराच आळा बसणार आहे. तसेच शाळेचे मुले शाळेत दुचाकी घेऊन येतात. त्यावेळी भरधाव वेगाने वाहन चालविले जाते.

यांना पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना वाहने विनापरवाना चालविण्यास प्रतिबंध केला पाहिजे. शाळे जवळील रस्त्यावर गाड्या ठेवल्या जातात. त्यावर आळा घातला पाहिजे. प्रवासी गाड्या मुख्यरस्त्यालगत दोन्ही बाजूंनी ठेवल्या जातात.हेही थांबणे गरजेचे आहे.

कोंडीला कारण : प्रत्येकजण बाजारहाटसाठी वाहन घेऊन वाळपईत येतो. परिणामी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढलेली आहे. वाळपईत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक आराखडा तयार केला होता. लोक नोकरीसाठी जाताना वाळपईत रस्त्यालगत दुचाकी ठेवून सकाळी जातात. ते रात्री उशिरापर्यंत दुचाकी तिथेच ठेवतात. त्यामुळे इतरांना रस्त्यामधून वाहने नेताना वाहतूक कोंडी जाणवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

SCROLL FOR NEXT