Minister Subhash Phaldesai: मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते कारगिलवीरांच्या सेवेचा सन्मान

राज्य दिव्यांगजन आयोग आणि लक्ष्य फाउंडेशनचा उपक्रम
Minister Subhash Phaldesai
Minister Subhash PhaldesaiDainik Gomantak

Minister Subhash Phaldesai: कारगिल युद्धात भारताच्या विजयाच्या 25 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत, गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने लक्ष्य फाउंडेशन-पुणे आणि माहिती व प्रसिद्धी विभाग-गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युद्धामध्ये धीरोदात्त कामगिरी केलेल्या

तसेच आपल्या सशस्त्र दलाचा निश्चयी बाणा याचे स्मरण म्हणून या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत सैनिकांचा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Minister Subhash Phaldesai
DGP Jaspal Singh: स्थानिकांविना ड्रग्ज व्यापार अशक्य!

बिट्स पिलानी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये नायब सुभेदार रामदास श्यामजी पवार (निवृत्त), दया राम (निवृत्त), हवालदार मुनी लाल (निवृत्त), जोगिंदर सिंग (निवृत्त), हवालदार यश पॉल (निवृत्त), हवालदार मेहर सिंग, एचसी जीडी जनार्दन सोनवणे, आजिनाथ नामदेव शिरसाट आणि हवालदार जयहिंद सिंग यांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री फळदेसाई म्हणाले, १९९९चे कारगिल युद्ध हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक निर्णायक काळ आहे. प्रत्येक भारतीयाचे हृदय ही अदम्य भावना परिभाषेत करतानाच युद्ध जिंकणे ही आमच्या वीर सैनिकांसाठी एक कसोटी होती. असंख्य आव्हानांना सामोरे जात, आमच्या सैनिकांनी उल्लेखनीय शौर्य आणि दृढनिश्चय दाखवून भारतीयांच्या मनामध्ये मानाचे व आदराचे स्थान पटकावले. त्यांचे बलिदान, शौर्य आणि अढळ समर्पण आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे.

Minister Subhash Phaldesai
Sand Extraction: ‘झुआरी’ काठ उद्ध्‍वस्‍त करण्याचा घाट!

या कार्यक्रमास मेजर जनरल रवींद्र सिंग (एसएम बार), कर्नल प्रशांत कामत (एसएम), लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अनुराधा प्रभुदेसाई, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाजिक उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

कारगिल युद्धातील नायक मेजर जनरल रवींद्र सिंग (एसएम बार), कर्नल प्रशांत कामत (एसएम) यांच्यासमवेत या कार्यक्रमादरम्यान चर्चा-संवादही आयोजित करण्यात आला.

अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या, सीमेवरील संघर्षाबद्दल जाणून घेणे हा आपल्या सर्वांसाठी नेहमीच धडा असतो. यातून देशभक्ती आणि सैनिकांबद्दल आदर निर्माण होतो.

स्वतंत्र भारताचे खरे नायक!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या ध्वनिमुद्रित संदेशात म्हणाले, कारगिल युद्धातील दिग्गजांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याचा आम्हांला अभिमान आहे. ते आजच्या स्वतंत्र भारताचे खरे नायक आहेत. १९४७ पासून देशाने अनेक युद्धे लढली आणि सुखदेव, भगतसिंग यांसारखे अनेक भारतीय क्रांतिकारक विरांनी देशासाठी बलिदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com