पणजी: सांताक्रुझ परिसरातील शेततळ्यात मगरींचा वावर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या ठिकाणी वनखात्याने मगरींना पकडण्यासाठी सापळा लावला होता. तीन आठवडे झाले तरी सापळ्यात मगर येत नव्हती. अखेर आज शनिवारी सकाळी मगर सापळ्यात अडकली. या मगरीला चोडण येथील सलीम अली पक्षी अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मगर पडकली गेल्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास पकडला.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत याठिकाणी मगर असल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांच्या मते शेततळ्यात तीन मगरी असल्याचे सांगण्यात येत होते. पाऊस कमी झाल्यानंतर ऊन पडण्यास सुरुवात झाली तेव्हा मगर शेततळ्याच्या काठावर येऊन बसू लागली. तासन्सात ती बसत असल्याने पणजी-सांताक्रुझ रस्त्यावरून येजा करणारी मंडळी मगरीला पाहण्यासाठी गर्दी करीत होती.
वन खात्याला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तेथे सापळा लावला. परंतु पंधरा दिवस उलटले तरी सापळ्यात मगर काही आली नाही. अखेर आज शनिवारी सकाळी काही नागरिकांना सापळा हलत असल्याचे लक्षात आल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना ती बाब कळविण्यात आली. खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केल्यावर मगर सापळ्यात अडकल्याचे दिसून आले.
आणखी दोन मगरींचे वास्तव्य?
ज्या शेततळ्याच्या बाजूला मगर सापळा लावून पकडली, त्या शेततळ्यात आणखी दोन मगरी असल्याचे लोक सांगतात. काहींनी त्यांना प्रत्यक्षात पाहिल्याचीही चर्चा आहे. परंतु कोणत्या ठिकाणी त्यांचा वावर आहे, हे कोणालाच निश्चित माहीत नाही. शेततळ्यातून मगरी बाहेर येताना कोणालाही कशा दिसल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थिती होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.