Manohar Borkar and Rajendra Talak Dainik Gomantak
गोवा

Margao Ravindra Bhavan : अखेर 18 महिन्यांच्या प्रतिक्षेनंंतर मडगाव रवीन्द्र भवनाला मिळाला अध्यक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Ravindra Bhavan : जवळ जवळ 18 महिने अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिकामे राहिल्यानंतर आता मडगावच्या रवीन्द्र भवनच्या अध्यक्षपदी सिनेनिर्माता व दिग्दर्शक राजेंद्र तालक तर उपाध्यक्षपदी फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांची नियुक्ती सरकारने केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी जारी केले आहेत. 

नियुक्तीबद्दल राजेंद्र तालक यांच्याशी संपर्क साधला, ते म्हणाले, या नियुक्तीबद्दल आपल्याला आजच कळले. शुक्रवारी आपण अध्यक्षपदाचा ताबा घेण्यासंदर्भात निर्णय घेऊन सोमवार पर्यंत ताबा घेतला जाईल. मडगावच्या रवीन्द्र भवनला आपण गतवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करु असे तालक यांनी सांगितले.

राजेंद्र तालक यापुर्वी 2017 ते 2020 या कालावधीत गोवा राज्य मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी होते. शिवाय पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्राचे व मनोरंजन सोसायटीचे ते कार्यकारी सदस्य आहेत. 

राजेंद्र तालक यानी आठ चित्रपटांची निर्मिती केली असुन आलिशा व अंतर्नाद या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शिवाय गोवा राज्य चित्रपट महोत्सवात त्यानी 50 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

रवीन्द्र भवन मडगावच्या जनरल कौन्सिल मधील इतर सदस्य - उमेश बांदोडकर (फातोर्डा), महेश कोनेकर (कोने, म्हार्दोळ, फोंडा), परेश नाईक (दवर्ली), मिलाग्रीन गोम्स  ( फातोर्डा), श्वेता लोटलीकर (फातोर्डा), अनिल पै (आके, मडगाव), नितीन प्रभुदेसाई (सारवडे, मडगाव), सावियो मास्कारेन्हस (मडगाव), गोपाळ नाईक (कोंबा, मडगाव), धनंजय मयेकर (मालभाट, मडगाव)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT