Goa Congress Party  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस विधिमंडळात गटनेते पदासाठी चढाओढ

दिगंबर कामत आणि मायकल लोबो शर्यतीत, आमदारांशी संपर्क

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या तसेच धक्कादायक निकाल स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसला विरोधकाची भूमिका बजावावी लागणार आहे, त्यासाठी काँग्रेस विधीमंडळ नेता निवडीसाठी अजून बैठकही झाली नाही. या नेतेपदासाठी

मडगावचे आमदार दिगंबर कामत व कळंगुटचे आमदार मायकल लोबो शर्यतीत असून काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांशी त्यांनी संपर्क सुरू केला आहे.

विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळण्याची आशा असलेल्या काँग्रेसची निराशा झाली आहे. निवडणुकीत काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र, मागील निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्याने सरकार बनवण्याची स्वप्ने अधुरीच राहिली. निकालानंतर त्यांची पणजीतील कार्यालय तसेच पाटो येथील निवडणूक प्रचार कार्यालयात नेते व कार्यकर्त्यांची उपस्थितीही नसल्यासारखीच आहे. निवडून आलेल्या आमदारांबरोबर पक्षाचा विधीमंडळ नेता ठरविण्यासाठी अजून बैठकही बोलावण्यात आलेली नाही. मतदान व मतमोजणीपूर्वी जी ऊर्जा या पक्षाच्या नेत्यांमध्ये होती, ती कमी झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर पक्षाच्या कार्यालयात विजयी उमेदवार वरिष्ठ नेत्यांना भेटल्यानंतर त्यानंतर कोणीही अजून संपर्क केला नाही तसेच बैठकीसाठी निमंत्रण दिलेले नाही अशी माहिती एका आमदाराने सांगितली.

काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडीसाठीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. विधानसभा अधिवेशन बोलावण्यात आल्यानंतर विश्‍वादर्शक ठराव अधिवेशनात मांडण्यात येणार त्यावेळी काँग्रेस हा सर्वाधिक जागा असलेला विरोधी पक्ष असल्याने त्यांना पक्षनेत्याची माहिती द्यावी लागणार आहे. पक्षाचा विधीमंडळ नेता हाच विरोधी पक्षनेता असेल. काँग्रेसकडे अकरा आमदार आहेत. त्यामुळे या पक्षाचा गटनेता या आमदारांमधूनच निवडला जाणार आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले.

नेता निवडीबाबत काँग्रेसमध्ये विभाजन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध होऊ शकले नाहीत. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवडून आलेल्या आमदारांमध्ये विभाजन झाले आहे. काहींनी दिगंबर कामत यांना, तर काहींनी मायकल लोबो यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय नेते यासंदर्भात निर्णय घेण्याची अधिक शक्यता आहे.

दिंगबर कामत काँग्रेसचे एकनिष्ठ

दिगंबर कामत हे काँग्रेसचे एकनिष्ठ, ज्येष्ठ नेते व आमदार आहेत. गेल्या पाच वर्षांत पक्षाच्या १५ आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला, तर कामत व प्रतापसिंह राणे हे दोनच आमदार शेवटपर्यंत पक्षात राहिले. कामत यांना काँग्रेस सोडण्यासाठी अनेक आमिषे दाखवण्यात आली. मात्र, त्यांनी पक्ष सोडला नाही व पक्षाच्या अडचणीवेळी ते कायम पक्षातच राहिले. दुसऱ्या बाजूने कळंगुटचे मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बार्देश तालुक्यात बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण केले. मात्र, मतविभाजनामुळे काँग्रेस उद्दिष्ठ गाठू शकला नाही.

काँग्रेस हा विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवलेला दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असणार आहे. मी या पदासाठी कोणतीच लॉबिंग करत नाही. काँग्रेसच्या हायकमांडनी जर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपविली तर ती स्वीकारण्यास तयार आहे.

- मायकल लोबो, काँग्रेस आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT