गोव्यात 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे जास्तीत जास्त शो दाखवणार: प्रमोद सावंत

'द काश्मीर फाइल्सचे' निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पीएम मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
The Kashmir Files Movie News | Pramod Sawant News Updates
The Kashmir Files Movie News | Pramod Sawant News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी यात सांगण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हा चित्रपट (Movie) आवडला. मोदींनी चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मोदींनंतर आता प्रमोद सावंत यांनी देखील 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे कौतुक केले आहे. (Pramod Sawant News Updates)

The Kashmir Files Movie News | Pramod Sawant News Updates
मांद्रे महाविद्यालयात विद्यार्थी परिषद

याबाबत ट्वीट करत सावंत लिहितात, 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे जास्तीत जास्त शो दाखविण्यासाठी मी आयनॉक्सच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. काश्मीरी हिंदूंनी सोसलेल्या यातना, दुःख, संघर्ष सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे.

The Kashmir Files Movie News | Pramod Sawant News Updates
मुळगाव येथील केळबाई देवस्थानच्या अध्‍यक्षपदी वसंत गाड

‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाचे पोस्टर लावले नसल्याचे कारण पुढे करून मडगाव येथील आयनॉक्स थिएटरच्या कर्मचाऱ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याची घटना घडली असून यासंबंधी 45 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.याच दरम्यान, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखू नका अशी सूचना खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयनॉक्स व्यवस्थापनाला केल्याने या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.

यासंबंधी आयनॉक्सचे व्यवस्थापक जोजफ परेरा यांनी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर 45 अज्ञात व्यक्तींविरुद्ध बेकायदा जमाव जमवून थिएटर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला.

The Kashmir Files Movie News | Pramod Sawant News Updates
नुवे बायपासवर ट्रॅफिक सिग्नल्सच नाहीत

'द काश्मीर फाइल्सचे' निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पीएम मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी फोटो (Photo) शेअर करत लिहिले- 'मला खूप आनंद होत आहे की अभिषेकने सत्य दाखवण्याचे धाडस केले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी USA मधील #TheKashmirFiles चे स्क्रीनिंग फायदेशीर ठरले.

मोदींना चित्रपट आवडला, तर निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले – 'आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना भेटणे हा एक सुखद अनुभव होता. याआधी चित्रपटाची निर्मिती करताना आम्हाला इतका अभिमान वाटला नव्हता. धन्यवाद मोदीजी...'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com