Goa FDA inspection on commercial establishments Dainik Gomantak
गोवा

Goa FDA Raid: हणजूण येथे 'एफडीए'कडून 13 व्यावसायिकांची तपासणी, सहा आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश

FDA Inspection Anjuna: खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हणजूण परिसरात विशेष पाहणी मोहीम राबवली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हणजूण परिसरात विशेष पाहणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान उपाहारगृहे (रेस्टॉरंट्स), बेकरी आणि चिकन स्लॉटर युनिट्ससह एकूण १३ अन्न व्यावसायिकांची अचानक तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान अस्वच्छता आणि नियमभंग आढळल्याने ‘एफडीए’ने एकूण सहा आस्थापनांवर तात्काळ कामकाज बंद करण्याची कारवाई केली आहे. यात अस्वच्छ वातावरणात काम करणाऱ्या आणि स्थानिक पंचायत तसेच आरोग्य खात्याचे अनिवार्य ''ना हरकत प्रमाणपत्र'' न घेणाऱ्या तीन चिकन स्लॉटर युनिट्सना काम बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय अस्वच्छतेप्रकरणी एक बेकरी आणि दोन रेस्टॉरंट्सनाही काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात अन्न सुरक्षिततेचे नियम पाळले जावेत यासाठी अशा प्रकारच्या अचानक तपासणी मोहिमा यापुढेही सुरूच राहतील, असा इशारा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षेच्या मानकांचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा त्यांचे परवाने रद्द किंवा निलंबित केले जातील, असे आवाहनही करण्यात आले आहे.

१५ हजार रुपये दंड

त्रुटींची पूर्तता करून स्वच्छता सुधारत नाही, तोपर्यंत ही आस्थापने बंदच राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईदरम्यान एफडीएच्या पथकाने चार आस्थापनांमधील वापरलेल्या खाद्यतेलाची ''टीपीसी मीटर''द्वारे तपासणी केली. सुदैवाने, तेलाचे नमुने नियमानुसार सुरक्षित मर्यादेत असल्याचे आढळले. तर दुसऱ्या बाजूला, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका अन्न व्यवसायचालकाला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT