FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: ताळगाव मार्केट, कळंगुट, पणजीतील अन्न विक्रेत्यांवर FDA ची करडी नजर! नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

FDA Raid In Goa: मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने ताळगाव मार्केट, पणजी, कळंगूट, बागा व म्हापसा परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांवर तपासणी मोहीम राबवली.

Sameer Amunekar

पणजी: मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने ताळगाव मार्केट, पणजी, कळंगूट, बागा व म्हापसा परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांवर तपासणी मोहीम राबवली. एफडीए निर्देशित अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, तसेच साफिया खान आणि अमित मांद्रेकर यांच्या पथकाने संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी केली.

या मोहिमेचा उद्देश यापूर्वी तपासणी केलेल्या आऊटलेट्सची पुन्हा पाहणी करून नियमांचे पालन केले जाते की नाही, हे तपासणे हा होता. दरम्यान ताळगाव व पणजीतील चार आऊटलेट्सची तपासणी करण्यात आली.

यामध्ये ताळगाव मार्केटमधील ‘बेंगलोर बेकरी’ यांच्यावर १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कळंगूटमधील आशादुल मुल्ला यांच्या एक आऊटलेटमध्ये नियमांचे पालन न केल्याबद्दल ८,००० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दुकान तात्काळ बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आले.

बागा समुद्रकिनारी स्ट्रीट व्हेंडर्सची देखील तपासणी करण्यात आली. विक्रीसाठी ठेवलेली कापलेली फळे त्वरित नष्ट करण्यात आली. ‘मेसर्स अंबिका कोल्ड ड्रिंक्स’ या आऊटलेटला अत्यंत अस्वच्छ स्थितीत व्यवसाय करत असल्यामुळे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

म्हापसा अलंकार परिसरातील काही विक्रेत्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली व येत्या मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

SCROLL FOR NEXT