Mapusa FDA Action Dainik Gomantak
गोवा

केळी खाताय सावधान! म्हापशात रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेली तब्बल 8 क्विंटल केळी जप्त

एफडीएची कारवाई : 65 हजारांच्या मालाची लावली विल्हेवाट

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa FDA Action : इथेफॉन या घातक रसायनाचा वापर करून पिकवलेली 800 किलो केळी म्हापशात जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, एफडीएने ही कारवाई बुधवार, 5 रोजी म्हापसा सबयार्डमध्ये केली. येथील घाऊक दुकानात मगबोद अहमद याने रासायनिक पद्धतीने पिकवलेली सुमारे 8 क्विंटल केळी साठवल्याचे एफडीएला आढळले. संबंधित दुकानदाराने केळी पिकविण्यासाठी इथेफॉन या द्रव्याचा वापर केला होता. हे द्रव्यही जप्त करण्यात आले.

ही केळी जप्त करून म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या नष्ट केलेल्या केळ्यांची किंमत 65 हजार रुपये इतकी आहे. याशिवाय या दुकानातील इतर फळांचे नमुने घेत ते अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

दरम्यान, सोमवारी म्हापसा सबयार्डमधील शेख हनीफ यांच्या दुकानातील केळ्यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यानुसार, दुकानातील केळी या रासायनिक प्रक्रियेद्वारे या व्यावसायिकाने पिकविल्याचे आढळून आले. अशी केळी खाल्ल्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

दुकानदाराविरोधात गुन्हा

कृत्रिमरित्या केळी पिकवल्याप्रकरणी व साठवल्याप्रकरणी दुकानदारविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानक कायद्यान्वये पुढील कारवाई केली जाईल. या कारवाईत उत्तर गोवा नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, एफएसओ माधव कवळेकर, एफएसओ सोनल गोवेकर व साईनाथ च्यारी यांनी सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

Goa Rakhonn Yatra: 'कळंगुटच्या राखण यात्रेसाठी केपेतील लोकांना पैसे देऊन आणले'; मायकल लोबो यांचा काँग्रेसवर घणाघात

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT