Padma Awards 2023: रवीना टंडन अन् एमएम किरवानी यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित! पाहा खास क्षण...

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि 'नाटू-नाटू' गाण्याचे संगीतकार एमएम कीरवानी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Raveena Tandon
Raveena Tandon Dainik Gomantak
Published on
Updated on

Padma Awards 2023 Raveena Tandon and MM Keeravani: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि ऑस्कर विजेचा 'नाटू-नाटू' गाण्याचे संगीतकार एमएम कीरवानी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

‘केजीएफ 2’ फेम अभिनेत्री रवीना टंडनने आतापर्यंत 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ रवीना टंडन सिनेविश्वात सक्रिय आहे.

रवीना टंडनने भारतीय चित्रपटसृष्टी बदलताना पाहिली आहे आणि या मनोरंजन विश्वाला एका नव्या उंचीवर नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Raveena Tandon
Where is Pushpa?... Video Viral : कुठे आहे 'पुष्पा'? पुष्पाचा थरारक व्हिडीओ झाला रिलीज

तर दुसरीकडे, एमएम कीरवानी यांनी जागतिक स्तरावर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या 'नाटू-नाटू' या गाण्याला नुकताच ऑस्कर मिळाला आहे.

या पुरस्कार सोहळ्यात रवीना टंडनने राष्ट्रपतींना तीन वेळा नमस्कार केला आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली.

अभिनेत्री रवीना टंडन चित्रपटसृष्टीशिवाय इतरही अनेक क्षेत्रात सक्रिय आहे. रवीना टंडन हिने आपल्या अभिनयाने चाहत्याच्या मनावर राज्य करत आहे. तसेच तिने अनेक सुपरह्ट चित्रपट केले आहेत.

रवीना टंडन बालहक्क, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक विषयांवरही काम करते. रवीनाने कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी आणि विज्ञान अशा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.

'रवीना टंडन फाऊंडेशन' चीही संस्थापक असुन वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य सेवा देण्यासाठी काम करते.

पद्मश्री हा देशाच्या सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक आहे. याच कार्यक्रमात दिवंगत गायिका वाणी जयराम यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाणी जयराम यांनी 18 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली होती.

संगीतकार एमएम कीरावानी यांना 'आरआरआर'(RRR) मधील 'नाटू नाटू' या गाण्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एमएम कीरवानी यांना हा विशेष पुरस्कार प्रदान केला आहे.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल चाहत्यांकडून कलाकारांचे अभिनंदन केले जात आहे. याआधी एमएम कीरवानी यांनी अकादमी पुरस्कार म्हणजे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com