Dabolim Airport 
गोवा

Dabolim Airport: मंत्री माविन यांनी राजीनामा द्यावा आणि दाबोळी व गोमन्तकीयांची माफी मागावी; सरदेसाई आक्रमक

Dabolim Airport: जीएमआर कपंनी केंद्रीय स्तरावर दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला.

Pramod Yadav

Dabolim Airport South Goa

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळवरुन कतार एअरवेजने येत्या 20 जूनपासून उड्डाणे मोपा येथे वळविण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीके झोड उठवली आहे. जीएमआर कपंनी केंद्रीय स्तरावर दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला. विजय सरदेसाई यांनी यावरुन मंत्री गुदिन्हो यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

GMR कंपनी सरकारवर दबाव टाकून मोपा विमानतळावर विमाने वळविणे चालू असून, स्वत:च्या मतदारसंघात असलेले दाबोळी विमानतळ आमदार माविन गुदिन्हो यांना वाचविता येत नसेल तर अशा हतबल मंत्री आणि आमदाराने राजीनामा द्यावा अशा शब्दात फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली.

काय म्हणाले विजय सरदेसाई?

मोपा विमानतळ चालवणारी जीएमआर कंपनी दाबोळीवरुन मोपाकडे उड्डाणे वळवण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करून, मंत्री माविन गुदिन्हो त्यांच्याच मतदारसंघातील दाबोळी विमानतळ बंद होण्यापासून वाचवण्यास ते असमर्थ असल्याचे ठामपणे सांगत आहेत.

Vijai Sardesai Tweet

सरकारच्या निर्णयांना विरोध करण्यास असमर्थ ठरल्याबद्दल माविन यांनी तात्काळ राजीनामा देऊन दाबोळी व गोमन्तकीयांची माफी मागावी.

माविन गुदिन्हो मंत्री आणि आमदार या नात्याने गोमन्तकीयांच्या इच्छा आणि आकांक्षांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. गोव्याच्या पर्यटनाचे भवितव्य बिघडले असून, राज्याच्या आर्थिक हितसंबंधांना तडा गेला आहे, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

दरम्यान, याबाबत मंत्री माविन गुदिन्हो यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'मोपाला मी कधीच विरोध केला नव्हता. दाबोळी बंद होणार नाही असे मी आश्वासन देतो. पर्वरीचा उड्डाण पूल पुर्ण झाल्यावर मोपाला कोणीच जाणार नाही परत दोबोळीकडेच येणार.'

'लोकसभा निवडणूक जवळ आल्याने विरोधक कसलेही विषय घेऊन वाद करत आहेत. मी स्पष्टपणे सांगतो की GMR कंपनीचा सरकारवर दबाव आहे,' असे गुदिन्हो म्हणाले.

'दाबोळी विमानतळासाठी माझा लढा शेवटपर्यंत चालूच रहाणार आहे. GMR कंपनी केंद्रातील काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दाबोळीवरील विमानसेवा वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी तसे होऊ देणार नाही. त्यांनी दिवास्वप्न बघणे सोडून द्यावे. एक कतार एअरवेज बंद झाली म्हणजे दाबोळी बंद होणार नाही,' असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT