Goa Loksabha Election 2024: दक्षिणेत तिघांमध्ये चुरस, उत्तरेत कोण? भाजपच्या उमेदवारांवर लवकरच होणार शिक्कामोर्तब

Goa Loksabha Election 2024: गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी वेगाने घडामोडी घडत आहेत.
Goa Loksabha Election 2024: BJP Candidates for North and South Loksabha Seat To Be Declared Today
Goa Loksabha Election 2024: BJP Candidates for North and South Loksabha Seat To Be Declared TodayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Loksabha Election 2024

गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी वेगाने घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपने उमेदवारांची नावे दिल्लीत पाठवल्यानंतर मंगळवारी छाननी समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसने देखील पाच नावे हायकमांडकडे पाठवल्याची सुत्रांनी माहिती दिली.

दरम्यान, भाजपने पाठवलेल्या नावांवर आज (बुधवारी) शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांच्या निश्चितीसाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची दिल्लीत बैठक होणार आहे.

भाजपने पाठवलेल्या नावांमध्ये दक्षिणेत बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक यांच्या नावात चुरस पाहायला मिळत आहे.

उत्तर गोव्यासाठी भाजपने श्रीपाद नाईक, दयानंद सोपटे, दिलीप परुळेकर आणि दयानंद मांद्रेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत उमेदवारांच्या नावांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Goa Loksabha Election 2024: BJP Candidates for North and South Loksabha Seat To Be Declared Today
Gold From Mushrooms: आळंबीपासून मिळणार सोन्याचे कण; गोव्यातील संशोधकांचे मोठे संशोधन

दक्षिणेत विनेब्लिटीच्या निकषांवर बाबू कवळेकर आघाडीवर तर उत्तरेतून कोण? यावर सस्पेंस कायम असून, उत्तरेतून भाजप वेगळा विचार करु शकतो अशी भाजपातील सुत्रांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या छाननी समितीची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा उमेदवारीसाठी राज्य निवड समितीकडून आलेल्या प्रत्येकी आठ नावांवर चर्चा झाली. त्यातून छाननी समितीने उत्तरेतून तीन आणि दक्षिणेतून दोन नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविली.

दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार फ्रान्सिक सार्दिन आणि विरियातो फर्नांडिस यांचा समावेश होता. मात्र, एल्विस गोम्स यांचे नाव यादीत नसल्याने त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com