Panaji: 'अल्पवयीन पीडित मुलीचे मन परिपक्व', विनयभंग प्रकरणातील संशयिताला जामीन देताना पणजी कोर्टाचे निरीक्षण

Panaji Session Court Decision: संशयित आरोपी श्रीपाद नाईकने जून 2022 ते 31 जानेवारी 2024 या काळात पीडित अल्पवयीन मुलीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री केली.
Panaji Session Court Decision
Panaji Session Court Decision
Published on
Updated on

Panaji Session Court Decision

सोशल मिडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मागवून तिची लैंगिक सतावणूक करुन फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अटकेत असणाऱ्या संशयित आरोपी श्रीपाद नाईकला पणजी सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. अल्पवयीन पीडित मुलीचे मन परिपक्व असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

संशयित आरोपी श्रीपाद नाईकने जून 2022 ते 31 जानेवारी 2024 या काळात पीडित अल्पवयीन मुलीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री केली. मैत्रीतून त्याने मुलीकडून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओची मागणी केली.

सोशल मिडियाच्या माध्यमातून मुलीचा संशयित आरोपीसोबत संपर्क झाला. त्यातून दोघांमध्ये संवाद वाढत केला. संशयिताने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओची मागणी केली त्यावेळी संशयित आरोपी तिच्या प्रेमात पडल्याचे तिने मान्य केले होते.

Panaji Session Court Decision
Dabolim Airport: दाबोळी बंद पाडण्याचा कट उघड; मोदींची दोहा भेट आणि गुदिन्होंचे GMR बाबत वक्तव्य, पाटकरांनी सांगितला घटनाक्रम

पीडित अल्पवयीन मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असले तरी मन परिपक्व आहे, असे म्हणता येऊ शकते. पीडित इयत्ता बारवीत शिक्षत होती, तिला सोशल मिडिया मोबाईल अॅप्लिकेशन कसे डाऊनलोड करता येतात याचे तिला ज्ञान आहे. तसेच, सोशल मिडियावर एखाद्या व्यक्ती ब्लॉक किंवा अनब्लॉक करण्याचे ज्ञान देखील तिला आहे.

पीडितेला स्वत:चा फोटो किंवा व्हिडिओ चित्रित करण्याची माहिती तिला आहे. पीडित संशयिताच्या प्रेमात असल्याने त्या भावनेतून फोटो अथवा व्हिडिओ शेअर केल्याचे दिसते. कोणत्यातरी दबावाखाली येऊन तिने संशयित किंवा इतर मुलांना फोटो पाठवल्याचे दिसत नाही, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने संशयित श्रीपादला जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com