Corlim ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "हे भाजपच्या राजकीय अध:पतनाचे लक्षण" विजय सरदेसाईंचा इशारा; 'नारळ' फोडून जल्लोष करणं पडणार महागात?

Shreefal Controversy Goa: ही आनंद साजरा करण्याची पद्धत नसून, गोवा फॉरवर्ड पार्टीचे निवडणूक चिन्ह असलेल्या 'नारळाचा' अपमान करण्याचा प्रयत्न असल्याचे विजय सरदेसाई यांनी म्हटले

Akshata Chhatre

Vijai Sardesai Statement: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर खोर्ली मतदारसंघात एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे विजयी उमेदवार सिद्धेश नाईक यांनी आमदार राजेश फळदेसाई यांच्या उपस्थितीत भररस्त्यात नारळ फोडून आपला विजय साजरा केला. मात्र, ही आनंद साजरा करण्याची पद्धत नसून, गोवा फॉरवर्ड पार्टीचे निवडणूक चिन्ह असलेल्या 'नारळाचा' अपमान करण्याचा प्रयत्न असल्याचे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

वादाची पार्श्वभूमी; एकाच जागेवर तिरंगी लढत

खोर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघात राजकीय समीकरणे अत्यंत रंजक होती. या जागेवर भाजपकडून सिद्धेश नाईक मैदानात होते. त्यांच्या विरोधात गोवा फॉरवर्डने आपला उमेदवार उभा केला होता. विशेष म्हणजे, गोवा फॉरवर्डशी युती असूनही काँग्रेसने देखील याच जागेवर आपला स्वतंत्र उमेदवार दिला होता.

या अटीतटीच्या लढतीत सिद्धेश नाईक यांनी विजय मिळवला. काल (२२ डिसेंबर) निकाल जाहीर झाल्यानंतर, गोवा फॉरवर्डच्या चिन्हाचा 'पराभव' दर्शवण्यासाठी सिद्धेश नाईक यांनी प्रतीकात्मकरीत्या नारळ फोडून भाजपचा विजय साजरा केला.

विजय सरदेसाईंचे प्रत्युत्तर

सिद्धेश नाईक यांच्या या कृतीवर संताप व्यक्त करताना विजय सरदेसाई म्हणाले की, "सिद्धेश नाईक यांनी उत्साहाच्या भरात 'श्रीफळाचा' अपमान केला आहे. श्रीफळ हे आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाते.

केवळ गोवा फॉरवर्डवरील राग काढण्यासाठी अशा प्रकारे पवित्र चिन्हाचा अवमान करणे हे भाजपच्या राजकीय अध:पतनाचे लक्षण आहे." सिद्धेश नाईक हे राजकीयदृष्ट्या या चिन्हामुळे प्रभावित झाल्याचे त्यांच्या कृतीतून दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला. भविष्यात अशा प्रकारे सांस्कृतिक चिन्हांचा अनादर टाळावा आणि संयम राखावा, असा सल्लाही सरदेसाई यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

Goa Noise Pollution: गोव्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही! 36 जणांवर कारवाई करत 20 लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इंगा

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

Goa Murder: 100 रुपयांचा 'रबर मुकुट' बनला रशियन तरुणींचा काळ! खुनी आलेक्सेईच्या फोनमध्ये सापडले 100 हून अधिक महिलांचे फोटो

SCROLL FOR NEXT