Goa Politics: गोविंद गावडेंच्या बालेकिल्ल्याला तडा! अपक्ष जल्मी विजयी; खांडोळ्यात नेते निष्प्रभ - कार्यकर्ते निर्णायक

Betki Khandola: श्रमेशच्या प्रचारात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि स्वतः गोविंद गावडे सहभागी झाले होते. परंतु या नेत्यांचाही काही प्रभाव पडला नाही.
Govind Gaude Assembly
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: माजी मंत्री गोविंद गावडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बेतकी-खांडोळ्यात १५०१३ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरूष ७२२२, महिला ७५९१ यांचा समावेश होता. यंदा ८१.३२ टक्के मतदान झाले. हा वाढीव टक्का सत्तेविरोधात गेला.

त्यामुळे अपक्ष उमेदवार सुनील जल्मी २०९३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. जल्मीना ८०८१, भाजप श्रमेश भोसले यांना ५९८८ तर आरजीचे विनय गावडे ८८०, ‘आप’चे शौनक कामत ७५ अशी मते मिळाली.

Govind Gaude Assembly
Goa ZP Election Result: 'जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्‍‍वास पुन्‍हा सार्थ ठरवला'! CM सावंतांचे प्रतिपादन; भाजपचा विजयोत्सव

हा कार्यकर्त्यांचा विजय!

श्रमेशच्या प्रचारात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि स्वतः गोविंद गावडे सहभागी झाले होते. परंतु या नेत्यांचाही काही प्रभाव पडला नाही, उलट जल्मी यांच्यासोबत कोणत्याही पक्षाचा नेता नव्हता, फक्त कार्यकर्ते होते. गद्दार, शहाजहान सारखे आरोप-प्रत्यारोप प्रचारात सुरू होते, तरी मतदारांनी, माझ्या सर्वपक्षीय समर्थकांनी परिवर्तन घडवले. हा कार्यकर्त्यांचा विजय, असे जल्मी यांनी सांगितले.

Govind Gaude Assembly
Goa ZP Election Result: 'जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्‍‍वास पुन्‍हा सार्थ ठरवला'! CM सावंतांचे प्रतिपादन; भाजपचा विजयोत्सव

बेतकी-खांडोळा झेडपी निवडणुकीचा निकाल हा केवळ उमेदवाराच्या विजयापुरता मर्यादित नाही, तर तो सध्याच्या आमदाराविरोधातील जनतेच्या नाराजीचेही प्रतिबिंब आहे. अनेकांच्या सकारात्मक पाठिंब्यापेक्षा नकारात्मक मतदानातून आपली भूमिका मांडली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.

अभय गुरुनाथ कामत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com