Cylinder Blast Dainik Gomantak
गोवा

Fatorda Cylinder Blast : फातोर्ड्यात हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; हॉटेलसह कारचे नुकसान

स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा येथील एका इमारतीच्य तळमजल्यावर असलेल्या देसी तडका या हॉटेल मध्ये रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच या स्फोटात हॉटेलमधील खुर्च्या, टेबल यासह हॉटेलच्या बाहेर असलेल्या चारचाकी गाडीचे व एका दुचाकी नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फातोर्डा आर्लेम येथील जंकशनच्या ठिकाणी इंपेरिअल एव्हेन्यू या इमारतीच्य तळमजल्यावर असलेल्या देसी तडका या हॉटेल मध्ये काल रात्री उशिरा एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या मेहबूब नलेगार यांनी आपली रेंट अ कार हॉटेलबाहेरील रस्त्यावर उभी केली होती. स्फोटानंतर सिलिंडरसह हॉटेलमधील साहित्य उडाल्याने गाडीचे नुकसान झाले.

सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज कारचालकाने व्यक्त केलेला आहे. या बरोबरच या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या एका दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिलिंडर चा स्फोट होण्याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. गॅस गळतीमुळे हा अपघात झाला अशी माहिती मडगाव अग्निशमन दल अधिकारी गिल सौझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: 'बर्च' पीडितांना भरपाई देण्यास लुथरा बंधू तयार; प्रस्‍ताव देणार, वकिलांनी दिली माहिती

Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

Shukraditya Rajyog 2026: 17 ऑक्टोबरपासून सोन्याचे दिवस सुरु! शुक्रादित्य राजयोग बदलणार 4 भाग्यशाली राशींचे आयुष्य; सुख, समृद्धी आणि संपत्तीची होणार बरसात

मुलांना सोशल मीडिया निर्बंध गरजेचे, करिअरसाठी 'एआय' शिकण्यास प्राधान्य द्यावे- मंत्री रोहन खंवटे

खरी कुजबुज: ही निवडणूक की दहशतीचा खेळ?

SCROLL FOR NEXT