Goa Cancer Hospital : गोव्यात लवकरच कर्करोग रुग्णालय सुरु होणार : आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

कर्करोग इस्पितळ त्रिपक्षीय करार लवकरच
Cancer
CancerDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cancer Hospital : केंद्र व राज्य तसेच मुंबईस्थित टाटा ममोरिअल सेंटर लवकरच गोव्यातील सरकारी रुग्णालयात कर्करोग रुग्णांसाठी ओपीडीसेवा सुरू करणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ट्विट करत दिली.

मंत्री राणे म्हणाले, "टाटा मेमोरियल सेंटरचे डॉक्टर आठवड्यातून एकदा नवीन हॉस्पिटलला भेट देतील. केंद्र, राज्य सरकार तसेच टाटा ममोरिअल सेंटरचे डॉ. श्रीखंडे कर्करोगाच्या रुग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यासाठी लवकरच सामंजस्य करार करणार आहेत."

Cancer
Goa News : म्हापसा येथील 21 वर्षीय युवकाचा आसगावात तळीत बुडून मृत्यू

"गोवा सरकारने नवीन रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले असून ते 16 ते 18 महिन्यांत तयार होईल. हा त्रिपक्षीय करार लोकांना कर्करोगावरील उपचार, प्रतिबंधात्मक काळजी आणि मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलप्रमाणेच कर्करोगाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करण्यास मदत करेल. नवीन हॉस्पिटल गोवा राज्यातील हजारो लोकांना मदत करेल तसेच सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कारवामधील काही भागातील रुग्णांनाही होणार आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नेहमीच आरोग्याला अधिक प्राधान्य दिले आहे. आरोग्य सेवा देशातील गरीबातील गरीबांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. त्यांच्या या ध्येयामुळेच गोव्यात कर्करोगावरील उपचारासाठीचे उच्च दर्जाचे इस्पितळ सुरू होणार आहे ज्याचा लोकांना राज्याबाहेर न जाता गोव्यातच त्याचा लाभ घेता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kadamba Bus Drivers Recruitment
Prostate Cancer Warning Signs
Chaturgrahi Yoga In Cancer August 2026
Goa Cancer Deaths
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com