Siddhi naik Case
Siddhi naik Case Dainik Gomantak
गोवा

Siddhi Naik Case: सिद्धी नाईक प्रकरण दडपल्‍याचा वडिलांचा आरोप

दैनिक गोमन्तक

म्हापसा: सिद्धी नाईक (19) हिच्या कथित खूनप्रकरणी कळंगुट तसेच क्राईम ब्रँचने ठोस तपास न करताच हे प्रकरण दडपल्याचा आरोप करीत सिद्धीचे वडील संदीप नाईक यांनी या तपास यंत्रणांवर संताप व्यक्त केला. आम्हाला, आमच्या मुलीला न्याय हवाय आणि त्यासाठी आम्ही यापुढेही लढू, असे नाईक म्हणाले.

(Father accused of suppressing Siddhi Naik case)

पोलिस हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप नाईक यांनी केला असून, याकामी कळंगुट पोलिसांचा सहभाग आहे. सरकारने आम्हाला व माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नाईक यांनी केली. तसेच आम्‍ही मागे हटणार नाही किंवा डगमगणार नाही, आणखी जोमाने लढू, असे नाईक म्‍हणाले.

अनुत्तरित प्रश्‍‍न

माझ्‍या मुलीचा मृतदेह घटनास्थळावरुन बेकायदेशीरपणे हटवण्यात आला. बसमधून उतरणे आणि तिचा मृत्‍यू होणे या मधल्‍या काळात ती कुठे होती? तिच्या अंगावरील कपडे कसे गायब झाले? हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत असे म्हणत त्यांनी तपास यंत्रणेवर रोष व्यक्त केला. जर पुरावे मिळाले नाहीत तर पोलिसांनी हे प्रकरण खुनाचा गुन्हा म्हणून का नोंदवले? माझी मुलगी किनाऱ्यावर अर्धनग्नावस्थेत कशी सापडली, असे अनेक प्रश्‍‍न नाईक यांनी उपस्‍थित केले आहेत.

काय आहे प्रकरण?

गेल्यावर्षी 12 ऑगस्ट 2021 रोजी सिद्धी नाईक हिचा मृतदेह कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. तिने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला, यावरून पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शवचिकित्सा अहवालात तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे नमूद करण्‍यात आले होते. कळंगुट पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला होता. सरकारने हे प्रकरण 28 डिसेंबर 2021रोजी क्राईम ब्रँचकडे सोपविले होते. तसेच अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासकाम सुरू केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT