Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाचे भवितव्य आता अहवालावर

Mhadei River: कर्नाटकचा दाखल्यासाठी केंद्राकडे आग्रह

दैनिक गोमन्तक

Mhadei River: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटक सरकार आग्रही आहे. पर्यावरणीय दाखला मिळावा, अशी मागणी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. परंतु त्यासाठी आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) कळसा-भांडुरा प्रकल्प परिसरातील पर्यावरण आणि वन्य जीवांवर होणाऱ्या परिणामांवर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे.

एका महिन्यात या समितीने केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाला अहवाल सादर करावयाचा आहे. त्यावरच केंद्र सरकार दाखल्याविषयी निर्णय घेणार असल्याची माहिती म्हादई लढ्याचे अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी दिली.

कर्नाटकात सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पात काँग्रेसने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हादईचे पाणी वळवणारच, असे ठामपणे सांगत आहेत. या सरकारने केंद्राकडे पर्यावरणीय दाखल्याची मागणी केली आहे.

परंतु गोवा सरकारने आपल्या अहवालात या परिसराला ‘वाघाचा कॉरिडॉर'' असे नमूद केले आहे. त्यावर केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

प्रकल्पासमोरील अडथळे

  1. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नेमलेली समिती पर्यावरण आणि वन्य जीवांवर होणाऱ्या परिणामांवर संशोधन करणार.

  2. वाघ कॉरिडॉर क्षेत्रात म्हणजे खानापूर तालुक्यात कळसा-भांडुरा धरण बांधणे आणि पाणी वळवण्याच्या योजनांची प्रत्यक्ष क्षेत्राची पाहणी होणार.

  3. ‘एनटीसीए’ने कळसा-भांडुरा प्रकल्पाचा भूप्रदेशाच्या अखंडतेवर होणारा संभाव्य परिणाम मान्य करून वन्यजीव संरक्षण योजनेच्या आवश्यकतेवर दिला भर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT