Harvalem Waterfall  : सहा महिन्यात धबधब्यात पाच युवकांना जलसमाधी
Harvalem Waterfall : सहा महिन्यात धबधब्यात पाच युवकांना जलसमाधी  Dainik Gomanatak
गोवा

सावधान..! हरवळे धबधब्यात आंघोळीसाठी जाताय?

तुकाराम सावंत

डिचोली: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि पर्यटकांना वेड लावणारा हरवळे धबधबा(Harvalem Waterfall) आंघोळीसाठी दिवसेंदिवस असुरक्षित तेवढाच मृत्यूचा सापळा बनला आहे. या धबधब्यावर पर्यटक बुडण्याच्या घटना वाढत असून, गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत मिळून पाच युवकांना जलसमाधी मिळाली आहे. धबधब्यावर बुडून बळी जाण्याच्या या घटना पाहता, हा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी 'कर्दनकाळ' ठरला आहे.

गेल्या सहा महिन्यात एका मागोमाग घडलेल्या या दुर्घटना पाहता अद्याप या धबधब्यावर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने आता आणखी किती जणांचे बळींची सरकार वाट पाहत आहे. असा प्रश्न सामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे. धबधब्यावरील बळी रोखण्यासाठी एक तर या धबधब्यावर आंघोळीसाठी कायमची बंदी घाला. किंवा त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करा. अशी मागणी पुढे येत आहे.

जबाबदार कोण?

हरवळे येथील प्रसिद्ध श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसरातील हा धबधबा पर्यटन खात्याच्या अखत्यारीत येत आहे. या धबधब्यावरील बळी रोखण्यासाठी तीव्रगतीने उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी असतानाही तसे होत नाही. ही वस्तूस्थिती असली, तरी धबधब्यावर पर्यटनाची मजा लुटण्यासाठी येणारे पर्यटकही अतिउत्साह दाखवतात. अशी माहिती मिळाली आहे. या धबधब्यावरील धोका ओळखून या धबधब्यावर विशेष करून शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय श्री रुद्रेश्वर देवस्थानतर्फेही धबधब्यावर एक व्यक्ती तैनात ठेवण्यात आली आहे. मात्र या धबधब्यावर येणारे काही पर्यटक अतिउत्साह दाखवतात. सुरक्षा व्यवस्था आदी सुचनांकडे दुर्लक्ष करून धोका असतानाही आंघोळीसाठी पाण्यात उतरण्याचा आततायीपणा करतात. काहीजण धोका पत्करून 'फोटो सेशन' ही करतात. आणि मग काही पर्यटक मृत्यूला मिठी मारतात. पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला असतो. अशावेळी पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक असते. तरीही काही पर्यटकांना त्याची पर्वा नसते. आणि मग बुडून बळी जाण्याच्या घटना घडतात. यामुळे या घटनांना प्रशासनाएवढेच पर्यटकही जबाबदार असतात.

एप्रिलपासून पाच बळी

गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या धबधब्यावर आंघोळीची मजा लुटताना पाच युवकांना प्राणास मुकावे लागले आहे. विशेष म्हणजे बळी गेलेले पाचही युवक 18 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत. गेल्या 10 एप्रिल रोजी एकाच दिवशी गोलू कुमार आणि सत्यम कुमार या विशीतील मूळ बिहार आणि उत्तरप्रदेशमधील मिळून दोन युवकांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी मूळ पंजाब येथील नवज्योत सिंग हा 29 वर्षीय युवक यंदाच्या पावसाळी पर्यटनाचा पहिला बळी ठरला. या घटनेला बावीस दिवस उलटाण्या आधीच हर्ष राजेशकुमार या 21 वर्षीय युवकाचा बळी गेला. तर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी (ता.15) मूळ राज्याबाहेरील परंतु वास्को येथे स्थायिक झालेल्या अखिलेश जगदीश शर्मा या 21 वर्षीय युवक बुडण्याची घटना घडली आहे. गेल्या चार वर्षात या धबधब्यावर एकूण अकरा पर्यटकांना जलसमाधी मिळाली आहे. अशी माहिती मिळाली आहे.

कडक व्यवस्थेची मागणी

हरवळे धबधबा हा पर्यटन खात्याच्या अखत्यारीत येत असला, तरी हा धबधबा तीर्थक्षेत्र श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसरात आहे. धबधब्यावर एखादी दुर्घटना घडली, की हा परिसर चर्चेत येतो. धबधब्यावर फक्त शनिवारी आणि रविवारीच पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असते. धबधब्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी या धबधब्यावर कायम आणि अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची गरजेचे आहे. तशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अशी माहिती रुद्रेश्वर देवस्थानच्या महाजनांकडून देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT