Fake Police Fraud Dainik Gomantak
गोवा

Fake Police Fraud: डिचोलीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट! वृद्ध दुकानदाराची लाटली 7 लाखांची सोनसाखळी; अस्नोड्यातही महिलेला गंडा

Fake Police Fraud In Bicholim: पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करुन दोघा भामट्यांनी डिचोलीतील एका वृद्ध दुकानदाराची सात लाखांची सोनसाखळी हातोहात पळवली.

Manish Jadhav

Fake Police Dupe Elderly Shopkeeper Snatch 7 Lakh Gold Chain Bicholim

डिचोली: पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी डिचोलीतील एका वृद्ध दुकानदाराची सात लाखांची सोनसाखळी हातोहात पळवली. ही घटना बुधवारी (5 मार्च) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील सुंदरपेठ रस्त्याच्या जंक्शनवर घडली. दिवसाढवळ्या सदैव गजबजणाऱ्या भागात हा प्रकार घडल्याने खळबळ माजली असून, शहरात 'तोतया' पोलिसांचा वावर असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. भामट्याने गंडवलेल्या दुकानदाराचे नाव सुरेश फळारी असे आहे.

तोतया पोलिसांनी लाटली 7 लाखांची सोनसाखळी

तोतया पोलिसांनी पळवलेल्या सोनसाखळीची किमत जवळपास 7 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. सुरेश फळारी हे 11 वाजण्याच्या सुमारास दुकानासमोरील पेट्रोलपंपजवळ लघवी करुन दुकानाकडे येत असताना मोटारसायकलवरुन आलेले दोघेजण त्यांच्यासमोर थांबले. आम्ही पोलिस अधिकारी असून, शहरात सोनसाखळी खेचणारे फिरत आहेत, असे या भामट्यांनी फळारी यांना सांगून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी घेवून कागदात बांधून त्यांच्याकडे दिली आणि हे तोतया पोलिस निघून गेले.

अस्नोडातही महिलेला गंडवले

दुकानात आल्यानंतर कागदाची पुडी उघडली असता, सुरेश फळारी यांच्यावर कपाळावर हात मारण्याची पाळी आली. कागदाच्या 'त्या' पुडीत दगड होता. दरम्यान, तत्पूर्वी सकाळी 9 वा. अस्नोडा येथेही अशीच एक घटना घडली आहे. सुजाता गजानन कामत या महिलेची सोनसाखळी लांबवण्याची घटना घडली.

सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

या घटनेनंतर सुरेश फळारी यांनी डिचोली पोलिस स्थानक गाठून घडलेला प्रकार पोलिसांसमोर सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. डिचोली पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT