fake ED officer scam in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

Fake ED Case: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलराम बाबू करीशेट्टी हा पोलिसांच्या हाती तुरी देऊन दुबईला पळून गेला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलराम बाबू करीशेट्टी हा पोलिसांच्या हाती तुरी देऊन दुबईला पळून गेला आहे. तो तेथे दडी मारून बसल्याची खात्रीलायक माहिती मायणा-कुडतरी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिस सतर्क झाले असून गोवा पासपोर्ट भवनाशी संपर्क साधून त्याच्या आखाती देशातील पलायनाबाबत अधिक माहिती जाणून घेत आहेत. त्याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यासंबंधीही पोलिसांनी पावले उचलली आहेत. एकूण तपासकामाबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने शेट्टी याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो परागंदा झाला होता. त्याने गोव्यातून पळ काढला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पराकाष्ठा केली होती. मात्र, तो पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, तेथेही शेट्टी यांच्या पदरी निराशाच पडली. न्यायालयाने अर्ज नामंजूर केल्यानंतर त्याने दुबई गाठल्याचे आतापर्यंतच्या पोलिस चौकशीत आढळून आले आहे.

उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पणजी येथील त्याच्या पत्त्यावरही तो सापडू शकला नाही. तसेच पोलिसांनी कर्नाटकातील कारवार व हुबळी येथेही शोध घेतला. शेजारच्या महाराष्ट्रातील दोडामार्ग परिसरही पालथा घातला; मात्र त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही.

या वर्षी २४ मार्च रोजी माकाझन येथील कॅनरा बँकेसमोरून दुपारी बड्डे येथील अशोक कुमार या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. संशयितांनी त्यालाच त्याच्या ह्युंदाई व्हेन्यू कारमध्ये कोंबून शेजारच्या कर्नाटकातील कारवार येथील एका निर्जन स्थळी नेले व त्याच्याकडील तीन लाख रुपये जबरदस्तीने लुटून पळ काढला होता.

वडील मुख्य सूत्रधार

अशोक कुमार यांच्या अपहरण प्रकरणाची व्याप्ती चक्रावून टाकणारी आहे. बलराम याचे वडील बाबू हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात आढळून आले आहे. ते शेजारच्या दोडामार्ग येथे राहत असून तेथूनच आपले नेटवर्क चालवत होते. बलराम पोलिसांच्या हाती लागल्यास या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे उघड होण्याची शक्यता आहे. मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल गिरी पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT