Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat: तिसवाडी तालुक्यात प्रस्थापितांना धक्के

माजी मंत्री मडकईकर यांची मुलगी पराभूत

दैनिक गोमन्तक

पणजी: तिसवाडीतील १८ पंचायतीमध्ये अनेक प्रस्थापित तसेच राजकारण्यांच्या नातेवाईकांना धक्के बसण्याबरोबर अनेक प्रभागांमध्ये नवे उमेदवार निवडून आले आहेत. या पंचायतींमध्ये आमदारांचे समर्थन असलेल्या बहुतेक पॅनलला पंचायतींवर वर्चस्व मिळण्याइतपत बाजी मारता आलेली नाही.

(Ex-minister Madkaikar's daughter defeated)

जुने गोवे पंचायतीवर गेली अनेक वर्चस्व असलेल्या माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांची मुलगी सुहिरा पां. मडकईकर हिचा प्रभाग ४ मधून पराभूत झाल्याने दणका बसला आहे. सरपंच व उपसरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये चढाओढ लागणार आहे. त्यामध्ये स्थानिक आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

या तालुक्यातील संवेदनशील असलेल्या मेरशी, चिंबल व सांताक्रुझ पंचायतीमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या होत्या. चिंबलचे माजी सरपंच चंद्रकांत कुंकळकर व त्यांचे पुत्र पुंडलिक चंद्रकांत कुंकळकर या दोघांनाही यावेळी मतदारांनी घरी पाठवले. चंद्राकांत कुंकळकर यांना ३९ मतानी हार पत्करावी लागली. मेरशी पंचायतीमध्ये माजी सरंपच व भाजप नेते अनिल होबळे यांच्या पत्नी संध्या अनिल होबळे या निवडून आल्या आहेत. सांताक्रुझमध्ये समविचारी गटाने निवडणूक लढविली होती मात्र त्यातील लुईझा फर्नांडिस व मंगेश गावकर हे निवडून आले. आर्थुर डिसोझा व गटाचे नेते ॲड. आंतोनिओ लॉरेन्सो यांना पराभव पत्करावा लागला. सांत आंद्रे मतदारसंघातून आरजीचे एकमेव निवडून आलेल्या आमदार विरेश बोरकर यांचे समर्थक असलेल्या आझोशी मंडूर पंचायतीवर सातपैकी ४ उमेदवार निवडून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT