Milton Coutinho Passed Away Dainik Gomantak
गोवा

Milton Coutinho Passed Away: मडगावचे माजी नगराध्यक्ष मिल्टन कुतीन्हो यांचे निधन

Milton Coutinho: 30 मार्च 1933 या दिवशी जन्मलेले मिल्टन कुतीन्हो हे 1971 च्या मडगाव पालिका निवडणूकीत जिंकून आले होते.

Manish Jadhav

Ex Margao Council Prez Milton Coutinho Passed Away: मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मिल्टन कुतीन्हो ( वय वर्ष 91) यांचे मागच्या शुक्रवारी बाणावली येथे निधन झाले असून आज (18 जून) त्यांच्या पार्थिवावर मडगाव येथे अंत्यसंस्कार कऱण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी मर्सिया चार पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे. मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतीन्हो यांचे ते काका होत.

दरम्यान, 30 मार्च 1933 या दिवशी जन्मलेले मिल्टन कुतीन्हो हे 1971 च्या मडगाव पालिका निवडणूकीत जिंकून आले होते. 1972 साली ते नगराध्यक्ष बनले. मडगाव पालिकेचे दुसरे नगराध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला होता. यासाठी मागच्या वर्षी मडगाव पालिकेने इतर माजी नगराध्यक्षकासह त्यांचा सत्कार केला होता. मूळ शिरवडे येथील कुतीन्हो हे सध्या बाणावली येथे आपल्या मुलाकडे रहात होते.

आज 18 जून रोजी दुपारी 3.30 वाजता त्यांच्या शिरवडे नावेली येथील घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून 4 वाजता ग्रेस चर्चमध्ये अंतीम प्रार्थना झाल्यावर होली स्पिरीट सिमेंट्रीमध्ये त्यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

Mapusa: भंगार वेचण्याच्या बहाण्याने आल्या, 'स्क्रू-ड्रायव्हर' घेऊन घुसल्या घरात; म्हापशात चोरीचा डाव उधळला; एका महिलेला अटक

SCROLL FOR NEXT