Goa Tourism: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 150 टक्के वाढ; यंदा एक कोटी पर्यटकांची नोंद

Goa Tourism: गोवा राज्याला नवीन बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून व्यवसायवृद्धी करण्याची गरज आहे असेही मत पर्यटनमंत्र्यांनी नोंदवले.
Tourist In Goa
Tourist In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism

कोरोना महामारीनंतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दीडशे टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या पर्यटन हंगामात विक्रमी एक कोटी पर्यटकांची नोंद झाली असून, पावसाळी हंगामातसुद्धा पर्यटकांचा गोव्यात ओघ सुरुच आहे. यामुळे गोव्यातील पर्यटकांची संख्या कमी होत असल्याचा समज चुकीचा सिद्ध झाल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.

पर्यटनाबाबत गोवा इतर राज्य नव्हे तर आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी स्पर्धा करीत आहे. गोव्यातला पर्यटन हंगाम पावसाच्या आगमनासोबत जून महिन्यात संपतो आणि सप्टेंबरमध्ये पूर्ववत होतो पण पावसाळा सुरु होऊनसुद्धा गोव्यात पर्यटकांचा ओघ सुरु आहे.

'मान्सूनमध्येही गोव्यातील 80 टक्के हॉटेल्स भरलेली आहेत. पावसाळ्यात तुडुंब गर्दी होत असून, गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारे हे लोकांच्या लक्षात आले आहे,' असे मत खंवटे यांनी व्यक्त केले.

'पर्यटकांची संख्या वाढत आहे. एक कोटी या विक्रमी पर्यटक संख्येला आम्ही गवसणी घातली आहे,' असे त्यांनी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

गोवा राज्याला नवीन बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून व्यवसायवृद्धी करण्याची गरज आहे असेही मत त्यांनी नोंदवले.

पर्यटनक्षेत्राच्या वाढीसाठी आम्ही विकास आराखडा तयार केला आहे आणि त्याची अंमलबजावणी पर्यटनक्षेत्रातील भागभांडवलदारांच्या सहभागाने होईल. आम्ही यादृष्टीने पावले उचलत आहोत असेही खंवटे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देखो अपना देश' या उपक्रमाचा नारा दिल्यापासून पर्यटनवाढीसाठी आमची इतर राज्यांशी जोरदार स्पर्धा सुरु आहे असे पर्यटनमंत्र्यांनी मान्य केले. आम्हाला या इतर राज्यांसोबतच्या तसेच आंतरराष्ट्रीय पर्यायांच्या स्पर्धेच्या आव्हानाकडे नीट लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.

Tourist In Goa
Viral Video: 'गोवा फार दूर नाही, आजारी शिक्षकाला भेटण्यासाठी थोडा वेळ काढ,' काँग्रेस नेत्याची किंग खानला अखेरची विनंती

यातील महत्वाचे आव्हान म्हणजे डिसेंबरसारख्या महिन्यांमध्ये गोवा महागडे पर्यटनस्थळ होऊ नये. डिसेंबर महिन्यात हॉटेलच्या किंमती वाढतात त्यामुळे पर्यटक थायलंडसारख्या इतर पर्यायांकडे वळू लागतात जिथे तुलनेने खर्च गोव्याइतकाच होतो आणि पैसे वाचवता येतात.

डिसेंबर महिन्यात वाढणारा भाडेखर्च कमी करण्याबाबत एयरलाईन कंपनींसोबत आणि हॉटेल व्यवसायिकांसोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

'गोव्यातील मान्सून म्हणजे धबधबे, हिरवीगार झालेली गावे, जंगल आणि ग्रामीण भागातील पर्यटन आहे. पर्यटक जेंव्हा इकडच्या गावांना भेट देतात यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला चांगला फायदा होतो,' असे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com