Devotees bringing wooden poles for Jatra Dainik Gomantak
गोवा

पैंगीण गड्याच्‍या जत्रेसाठी लाकडी खांबाची उभारणी

दोन खांबांपैकी एक खांब जीर्ण झाल्याने तो यंदा बदलण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: महालवाडा-पैंगीण येथील श्री वेताळ देवाच्‍या प्रसिद्ध ‘गड्या’च्या जत्रेसाठी आज शेळी-लोलये येथून लाकडी खांब आणून तो उभा करण्यात आला. वाजतगाजत मिरवणुकीने हा खांब दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे दहा किलोमीटर अंतर पार करून देवालयाच्‍या प्राकारात आणण्यात आला. यावेळी शेकडो भाविक उपस्‍थित होते.

या जत्रेत सुमारे 40 फूट उंच दोन लाकडी खांबांवर लाकडी रहाट बसवून त्या रहाटाला गड्यांना बांधण्यात येते. त्‍यानंतर रहाट गरगरा फिरवला जातो. हा चित्तथरारक प्रसंग पाहण्यासाठी राज्यातून दूरवरून भाविक उपस्थिती लावतात. दोन खांबांपैकी एक खांब जीर्ण झाल्याने तो यंदा बदलण्यात येणार आहे. त्यासाठी शेळी-लोलये येथील अशोक प्रभुदेसाई यांच्या बागायतीतील ‘खोडगूस’ जातीच्या वृक्षाची निवड करून सर्व कायदेशीर सोपस्कारांनंतर तो कापण्यात आला होता. दर तीन वर्षांनी ही जत्रा होते.

सर्व ज्ञातींना समावून घेणार

या जत्रोत्सवाच्या आयोजनात समाजातील सर्व ज्ञातींचा सहभाग असतो. खांब कापणे, खांब उभा करणे यासाठी तळपण येथील गाबित समाजाचे सदस्य शिताफीने काम करतात. त्याचबरोबर या कामासाठी मोठे दोर, कुप्‍या त्यांच्याकडून पुरविल्या जातात. खांबासाठी वृक्ष कोणतीच मोडतोड न होता तो कापणे व नंतर देवालय प्राकारात

दोरखंडाच्या साह्याने उभा करणे यात त्यांचे कसब पणाला लागते, असे श्री परशुराम पंचग्राम देवालय कमिटीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर यांनी सांगितले.

जत्रोत्सवाला 8 मेपासून प्रारंभ

महालवाडा-पैंगीण येथील श्री वेताळ देवालयाची दर तीन वर्षांनी होणारी प्रसिद्ध गड्यांची जत्रा यंदा 21 मे रोजी होणार आहे. 8 मेपासून वेळू फोडून जत्रेच्या विधींना सुरूवात होणार आहे. 30 मे रोजी श्री वेताळ देवालयी रंगावली पूजेने जत्रोत्सवाची सांगता होईल. या काळात लोलये, पैंगीण व खरेगाळ या त्रिग्रामात लग्न, मुंज व अन्य शुभकार्ये न करण्याची पूर्वापार प्रथा आहे. 11 मे रोजी देवालयात दैत्याचा जागर होणार आहे. 18 रोजी चोरांचा जागर व अन्य जागर, 19 रोजी गड्यांस तेल लावणे, 20 रोजी दिवजांचा जागर, 28 रोजी श्री वेताळ देवालयी शुद्धाचार, 29 रोजी देवालयी खिच तर 30 मे रोजी रंगावली पूजा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tuyem Hospital: तुये येथील नवे रुग्णालय अखेर ‘गोमेकॉ’शी संलग्न! देखरेख समितीसाठी होणार बैठक

Horoscope: ‘सुपर योग’! प्रॉपर्टी आणि पैशात बंपर लाभ; कोणत्या राशींना होणार फायदा?

Suleman Khan: कोठडीतून पलायन प्रकरण! कॉन्स्टेबलसहित सुलेमान खानवर आरोप निश्चित

Goa News: ‘त्या’ निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन द्या! फौजदारी खटलाप्रकरणी गोवा खंडपीठाचा आदेश

Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

SCROLL FOR NEXT