कदंब पठार महामार्ग बनला ‘मृत्‍यूचा सापळा’

पथदीप बंद: भीषण अपघाताची भीती; रस्‍त्‍यावर गुरांचे बस्‍तान धोकादायक
Kadamba highway
Kadamba highwayDainik Gomantak

पणजी: पणजीहून फोंड्याच्‍या दिशेने जाणाऱ्या कदंब पठार महामार्गावरील पथदीप गेल्या कित्येक दिवसांपासून बंदच आहेत. त्‍यामुळे या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा रस्‍ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी गुरे ठाण मांडून बसत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कदंब पठारावरील राष्ट्रीय महामार्ग हा सहापदरी झाल्यापासून तेथून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महामार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळ्या पदरी (लेन) आहेत. मात्र तरीही वाहनचालक त्याचे पालन न करता कोणत्याही लेनमधून वाहने हाकतात. या वाहनांची गती सुमारे 100 किलोमीटरपेक्षा अधिक असते.

Kadamba highway
गोवा कला अकादमी होणार ऑगस्टमध्ये सज्ज

त्‍यातच या रस्त्यावर काळोख असल्याने तेथे असलेली गुरे दिसत नाही. यापूर्वी अनेकदा रस्त्यावर बसलेल्या गुरांना ठोकर दिल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकीचालकांना त्याचा धोका अधिक आहे. काहींना मृत्यूलाही सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.

या महामार्गावर पथदीप आहेत, मात्र अनेकदा ते बंदच असतात. एखादी महनीय व्यक्ती तेथून जाणार असली तरच पथदीपांची दुरुस्ती केली जाते, अन्‍यथा ते एकदा बंद पडले की त्याकडे वीज खाते तसेच संबंधित पंचायतही लक्ष देत नाही. यामुळे हा महामार्ग फक्त अतिमहनीय व्यक्तींसाठी आहे का, असा प्रश्‍न वाहनचालक उपस्‍थित करीत आहेत. महामार्ग रुंद तसेच खड्डेमुक्त असल्याने वाहनांची गती बेफाम असते. तसेच समोरून येणाऱ्या वाहनांचे दिवे प्रखर असल्याने पुढचे काहीच दिसत नाही. त्‍यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्‍वारांना मात्र जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com