गोवा कला अकादमी होणार ऑगस्टमध्ये सज्ज

गोविंद गावडे: 15 ऑगस्टचा मुहूर्त शक्य : नूतनीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण
Goa Kala Academy
Goa Kala Academy Dainik Gomantak

अनिल पाटील

पणजी: कला अकादमीच्या मुख्य इमारतीला लागलेल्या गळतीमुळे मुख्य थिएटर आणि प्रदर्शन सभागृहात पाणी साचत असल्याने ते बंद ठेवावे लागत होते. सरकारने 40 कोटी रुपये खर्चून या संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण सुरू केले आहे. इमारतीच्या डागडुजीचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून हे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अजून साडेतीन महिने लागतील. मात्र, 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी कला अकादमीचा

पडदा उघडण्यासाठी सरकारने मुहूर्त ठरवल्याची माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

Goa Kala Academy
RFDL Football Competition : जमशेदपूरकडून एफसी गोवाचा धुव्वा

गोमंतकीय कलावंतांची शिखर संस्था असलेल्या आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेली कला अकादमी सध्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामामुळे गेली अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कलाकारांची मोठी कुचंबणा होत आहे.

सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या मूळ इमारतीमध्ये काही ठिकाणी गळती लागली होती. याशिवाय मुख्य थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरत होते. यासाठीच या इमारतीचे विविध संस्थांच्या वतीने परीक्षण करण्यात आले. याशिवाय चार्ल्स कुरैया इन्स्टिट्युटचीही मदत घेण्यात आली असून संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण सुरू आहे. इमारतीचा मूळ ढाचा आणि रचनेला बाधा येणार नाही, अशा प्रकारे हे काम सुरू आहे.

Goa Kala Academy
गोव्यातील खाणींचा तीन महिन्यांत लिलाव

अशी आहे कला अकादमी

कला अकादमीच्या इमारतीचा मूळ ढाचा गोमंतकीय स्थापत्यशास्त्राचा असून येथे मुख्य थिएटर, ओपन एअर, ब्लॅक बॉक्स, प्रिव्ह्यू थिएटर, प्रदर्शन हॉल, ग्रंथालय, प्रशासन विभाग, भारतीय संगीताचे वादन, गायन, नृत्य, प्रशिक्षण वर्ग, पाश्‍चिमात्त्य संगीताचे पियानो, गिटार, व्हायोलिन या वर्गांचा येथे समावेश आहे.

स्थानिक प्रदेशातील साहित्याची निवड : या इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम 1973 ते 1983 या दरम्यान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गोमंतकीय वास्तुस्थापत्य शास्त्रज्ञ चार्ल्स कुरैया यांनी या इमारतीची आखणी आणि डिझाईन केले असून प्रामुख्याने इमारतीसाठी लागणारे साहित्य स्थानिक प्रदेशातील निवडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com