पणजी: गोव्यातील डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नवीन प्रकारचे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बनवले आहे. हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर वातावरणातील हवा शोषून घेते आणि कोविड रुग्णांना ऑक्सिजन पुरवते. हे उपकरण भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव - 2022 मध्ये मुख्य आकर्षण ठरले. (Engineering students develop oxygen concentrator in goa)
ज्या टीमने ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बनवले त्यामध्ये साहिल चित्रपुकर, शाहुल अहमद, कीनन कार्डोझो, अक्षय भाटुळे, निर्भय बोरकर यांचा समावेश आहे आणि टीमचे मेंटॉर प्रोफेसर जी सामंत आहेत.
कीनन कार्डोझो, ग्रुप लीडर, म्हणाले की, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डिव्हाईसची रचना आणि निर्मितीमागील मुख्य हेतू कोविड-19 रूग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही आहे. कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांनी जीव गमावला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.