ED Raids Dempo Group Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी : गोव्यात धेंपो उद्योग समुहावर ईडीचे छापे

धेंपो हाऊस आणि इतर आस्थापनांवर छापे सोमवारी सकाळपासूनच छापेमारी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील नामांकित धेंपो उद्योग समुहावर सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडीने छापा टाकला आहे. पणजीतील धेंपो हाऊस आणि इतर आस्थापनांवर छापेमारी केल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळपासून गोव्यात अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी सुरु केली आहे.

(ED Raids Dempo Group in Goa)

ईडीच्या धेंपो समुहावरील छानेमारीनंतर आता पणजीसह गोव्यात चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत धेंपो समुहाचे सर्वेसर्वा श्रीनिवास धेंपो यांनी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे पुत्र आणि पणजी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळेच त्यांच्यामागे ईडीची यंत्रणा लावल्याची कुजबुज पणजीत सुरु झाली आहे.

दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात अशा प्रकारची छापेमारी झाली नव्हती. त्यातच खाण व्यवसाय ठप्प असल्याने धेंपो समुहावरच धाड का टाकण्यात आली अशीही चर्चा सुरु आहे. धेंपोंनंतर अन्य व्यावसायिकांवरही ईडी धाड टाकणार का अशी धास्ती व्यावसायिकांना वाटू लागली आहे. काही काळापूर्वी अशीच शेख मुख्तार समुहावरही धाड टाकण्यात आली होती, ज्यात मोठ्या प्रमाणात सोनं आणि रोकड जप्त करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

VIDEO: 'घरातील गॅस सिलेंडर सुरु केला अन् थेट शेगडीवरच...', सोशल मीडियावर जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकऱ्यांनी पठ्ठ्याला घेतलं फैलावर

Viral Video: वापरलेली भांडी, अन्नाचा कचरा अन् रिकाम्या पॅकेट्सचा खच! गोव्यातील Airbnbचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह

VIDEO: धोनी स्टाईल गेम प्लॅन अन् ईशान किशनचा मास्टरस्ट्रोक! बापूनं जोस बटलरला केलं क्लीन बोल्ड; 'त्या' सल्ल्यानं खेळ खल्लास

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT