Bambolim Traffic Problem Dainik Gomantak
गोवा

Bambolim News: विक्रेत्यांचे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, वाहनांच्या रांगा; बांबोळीत वाहतूक समस्या ऐरणीवर

Bambolim: बांबोळी येथे उड्डाण पूल झाल्यापासून तेथील जंक्शनवर गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bambolim Traffic Problem

पणजी: बांबोळी येथे उड्डाण पूल झाल्यापासून तेथील जंक्शनवर गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी गोमेकॉ इस्पितळ असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहनांची बेशिस्तपणे पार्किंग केल्याने तसेच वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जात नसल्याने या जंक्शनवर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

भाजी-फळे विक्रेत्यांचे पदपथावरील अतिक्रमणही त्याला जबाबदार आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊनही पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी आहे.

दरदिवशी हजारो लोक गोमेकॉ इस्पितळात येत असतात. वाहने घेऊन इस्पितळात येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. या ठिकाणी असलेली पार्किंग जागा कमी पडत असल्याने जागा मिळेल तेथे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात व ती वाहतुकीला अडथळा ठरत आहे. काही वाहने अंडरपासच्या ठिकाणी रस्त्यावर उभी करून ठेवली जातात.

या इस्पितळाच्या प्रवेशद्वारावर भाजी विक्रेते बसतात त्यामुळे तेथे गर्दी होते. या ठिकाणी पूर्व असलेल्या विक्रेत्यांना हटवून त्यांचे स्थलांतर तेथूनच काही अंतरावर केले आहे. मात्र आता नव्याने आणखी भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असताना त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. सांताक्रुझ पंचायत तसेच पोलिसही या अतिक्रमाणाविरुद्ध कोणतीच कारवाई करत नाहीत.

दोनापावल, बांबोळी, सांताक्रुझ तसेच राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनामुळे तसेच तेथे असलेल्या अंडरपासमुळे वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी जंक्शनवर वाहतुकीचा आराखडा तयार केला आहे तो वाहन चालकांना गोंधळात टाकणारा आहे. तेथे असलेल्या सर्विस रस्त्यामुळे बसेस व ट्रक आल्यावर बाजू देताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने असलेल्या २० कलमी योजनेखालील घरामध्ये काहींनी दुकाने सुरू केली आहेत व त्याचा विस्तार रस्त्यापर्यंत पोहचला आहे. या दुकानांच्या बाहेर वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळे येत आहेत.

ग्रामसभेत चर्चा

रात्रीच्यावेळी फास्ट फूडची वाहने उभी करून तेथे टेबल्स व खुर्च्या रस्त्यावर घातल्या जातात. आगशी पोलिसही या ठिकाणी फिरकत नाही. त्यामुळे या फास्ट फूड चालकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी मिळते. ते बांबोळी जंक्शनच्या ठिकाणी असल्याने वाहन चालकांना तेथून वाट काढताना मुष्किलीचे होते. यासंदर्भात सांताक्रुझ पंचायतीचे लक्ष काही नागरिकांनी ग्रामसभेत वेधले होते, मात्र आश्‍वासने देण्याचे काम ही पंचायत करत आली आहे. या वाहतुकीच्या कोंडीवर पर्याय काढण्यासाठी उपाययोजना केली जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले!

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT