Ritika Sajdeh: रितिका सजदेहची लक्झरी चॉईस! मुंबईत खरेदी केलं नवीन आलिशान घर; किंमत तब्बल 'इतके' कोटी

Ritika Sajdeh new house Mumbai: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह हिने मुंबईतील पॉश वस्ती मानल्या जाणाऱ्या प्रभादेवी परिसरात एका आलिशान अपार्टमेंटची खरेदी केली आहे.
Ritika Sajdeh buys an apartment for ₹26 crore in Mumbai
Ritika Sajdeh buys an apartment for ₹26 crore in MumbaiDainik Gomantak
Published on
Updated on

Ritika Sajdeh buys an apartment for ₹26 crore in Mumbai

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह हिने मुंबईतील पॉश वस्ती मानल्या जाणाऱ्या प्रभादेवी परिसरात एका आलिशान अपार्टमेंटची खरेदी केली आहे. 'स्क्वेअर यार्ड्स'ने (Square Yards) पडताळणी केलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, या व्यवहारची किंमत तब्बल २६.३० कोटी रुपये इतकी आहे. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधील हा एक मोठा व्यवहार मानला जात असून, या निमित्ताने प्रभादेवी परिसरातील घरांच्या वाढत्या किमती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवीन घर प्रभादेवी येथील प्रतिष्ठित अशा 'आहुजा टॉवर्स' (Ahuja Towers) मध्ये आहे. या फ्लॅटचे कार्पेट क्षेत्रफळ २,७६०.४० चौरस फूट इतके मोठे असून, यासोबत तीन कार पार्किंग स्लॉट्स देखील देण्यात आले आहेत.

१२ डिसेंबर २०२५ रोजी या मालमत्तेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या व्यवहारासाठी रितिकाने १.३१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. रितिकाने हे अपार्टमेंट अजिंक्य डी. वाय. पाटील आणि पूजा अजिंक्य पाटील यांच्याकडून खरेदी केले आहे.

Ritika Sajdeh buys an apartment for ₹26 crore in Mumbai
Goa Fish Pollution: 'त्या अहवालामुळे नागरिकात भीतीचे वातावरण'! करंझाळेतील मच्छीमार आक्रमक; स्पष्टता देण्याची केली मागणी

रिअल इस्टेटमध्ये रोहित-रितिकाची गुंतवणूक

रितिका सजदेह ही एक यशस्वी स्पोर्ट्स मॅनेजर असून तिने अनेक बड्या खेळाडूंचे ब्रँड एंडोर्समेंट हाताळले आहेत. केवळ रितिकाच नव्हे, तर रोहित शर्मा देखील रिअल इस्टेटमध्ये सक्रिय आहे.

जानेवारी २०२५ मध्ये रोहितने लोअर परळमधील 'लोढा मार्क्युइज' येथील आपला फ्लॅट २.६ लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिला होता. त्यापूर्वी, २०२४ मध्ये त्याने वांद्रे पश्चिम येथील दोन अपार्टमेंट्स ३ लाख रुपये प्रति महिना या दराने तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले होते.

Ritika Sajdeh buys an apartment for ₹26 crore in Mumbai
Goa politics: युती न केल्‍यानेच ‘आप’ला निवडणुकीत फटका! पालेकरांचा दावा; सांताक्रूजमधील मतदारांना विश्‍‍वासात घेऊन निवडणार पर्याय

प्रभादेवी हा परिसर मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्रे जसे की लोअर परळ, वरळी आणि बीकेसी (BKC) यांच्याशी उत्तमरित्या जोडलेला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, प्रभादेवी रेल्वे स्टेशन आणि वांद्रे-वरळी सी लिंकमुळे या ठिकाणची कनेक्टिव्हिटी अत्यंत सुलभ आहे. यामुळेच कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज, व्यावसायिक आणि हाय-नेट-वर्थ व्यक्तींसाठी प्रभादेवी हे वास्तव्यासाठी पहिले पसंतीचे ठिकाण बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com