Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

गोव्यात वीज खंडित होण्याचं मुख्य कारण काय, वीज खात्याने दिलं 'हे' उत्तर

महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्यांचं काम सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात वीज वारंवार खंडित होण्याचं कारण वीज खात्याने सांगितलं आहे. झाडांच्या फांद्या वीज वाहिनीवर पडल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचं वीज खात्याने स्पष्ट केलं आहे. याचा सर्वाधिक फटका पावसाळ्यात बसत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

गोव्यात (Goa) सध्या असलेल्या अनेक ओव्हरहेड तारा या जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे झाड किंवा त्याची फांदी पडल्याने त्या तुटण्याच्या घटना घडतात. साहजिकच वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळेच अनेक ठिकाणी वीज (Electricity) खात्याकडून ओव्हरहेड वायर आता भूमिगत करण्याचं काम सुरु आहे. यामुळे वीजपुरवठ्यावर होणारा परिणाम कमी करता येणार आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्यांचं काम सुरु असून अनेक ठिकाणी काम पूर्णत्वास आलं आहे.

अनेकदा वीज खंडित झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली जाते. काही काळानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे वीजेची समस्या वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच उच्च दाबाचा वीज पुरवठाही करण्याचं तज्ज्ञांनी सुचवलं होतं. मात्र ज्याठिकाणी जास्त ग्राहक आहेत, किंवा जास्त मागणी आहे अशाच ठिकाणी हाय व्होल्टेज वीजपुरवठा करणं योग्य असल्याचं वीज खात्याचं म्हणणं आहे. दरम्यान फोंडा (Ponda) येथे वीज खात्याने प्रशिक्षण केंद्र सुरु केलं असून याठिकाणी तांत्रिक तसंच कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केल जातं. काही नामांकित संस्थांची मदतही या प्रशिक्षणासाठी घेतली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

C K Nayudu Trophy: गोव्याला मोठा फटका! पहिल्याच लढतीत पराभव; झारखंडचा 113 धावांनी एकतर्फी विजय

T20 Cricket Tournament: शेवट गोड! गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंची दिवाळी, आसामवर केली मात

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

Mandrem Accident: भरधाव ट्रकची स्कुटरला धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; पुराव्यांअभावी चालकाची निर्दोष सुटका

SCROLL FOR NEXT