मुंडकाराच्या खटल्यांना सहा महिन्यांत निकाली काढणार : बाबूश

गोव्यात सध्या मुंडकारांची 16,260 प्रकरणे प्रलंबित असल्याची स्थिती
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात सध्या मुंडकारांच्या खटल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच प्रलंबित खटल्यांना येत्या 6 महिन्यामध्ये निकाली काढणार असल्याचं आश्वासन बाबूश मोन्सेरात यांनी दिलं आहे. गोव्याच्या महसूलमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी लागलीच आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

Babush Monserrate
पालिकेच्या हलगर्जीपणामुळेच पाईपलाईन फुटली, सड्यातील नागरिक आक्रमक

याआधी महसूलमंत्री असलेल्या जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate) यांनीही मुंडकरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. अनेक वर्षांपासून मामलेदारांच्या न्यायालयात (Court) मुंडकरांच्या हजारो केसेस रखडलेल्या आहेत. बाबूश मोन्सेरात यांचा जनसंपर्क चांगला असल्याने तसंच त्यांनी मुंडकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बोलल्याने मुंडकारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुंडकारांचे तब्बल 16,260 खटले 2012 पासून निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आता बाबूश यांनी पुढाकार घेतल्याने मुंडकारांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Babush Monserrate
‘कमिशनराज’ बंद झाले पाहिजे, आपचा निशाणा

मुंडकारांनी प्रलंबित खटल्यांवर नाराजी व्यक्त केली होती. तसंच मामलेदारांकडून या खटल्यांना तारीख पे तारीख नाट्य रंगवलं जात असल्याचा आरोपही होत होता. वेगवेगळी कारणं देत ही प्रकरणं लांबवली जात असल्याचंही बोललं जात होतं. मात्र मुंडकारांचे दाखल असलेले प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बाबूश (Babush Monserrate) यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com