वास्को : मुख्य पाईपलाईन गुरुवारी फुटल्याने गेल्या चार दिवसांपासून कस्टम कॉलनीत पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पालिकेलाच पाईपलाईन फुटल्याप्रकरणी जबाबदार धरत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
पालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच पाईपलाईन फुटली आहे, ज्यांनी कचरा प्रकल्पाबाहेर टाकला होता. हा कचरा (Garbage) उचलण्यासाठी अवजड अशी जेसीबीसारखी वाहनं वापरण्यात आली ज्यामुळे पाईपलाईन फुटल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचीही स्थानिकांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर पाण्याची समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे.
दुसरीकडे पाण्याची (Water) समस्या या भागात कायमचीच असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. रस्त्याशेजारी टाकलेल्या कचऱ्याची उचल करताना जेसीबीसारख्या वाहनांमुळे पाईपलाईनला कायमच धोका असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. कचऱ्याच्या मोठ्या ढीगांमुळे पाण्यामध्येही त्याचा निचरा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न उद्भवत असल्याचाही आरोप केला जात आहे. तसंच पालिका अभियंता (Engineer) आणि सार्वजनिक बांधकाम अभियंता सहकार्य करत नसल्याचाही नागरिकांचा आरोप आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.