Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

वीजेचा खांब कोसळल्याने दुचाकीवरील तरुणी गंभीर जखमी

पणजी परिसरातील अल्तिन्हो येथील घटना, रस्ते सुरक्षिततेच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर

दैनिक गोमन्तक

पणजी : धावत्या दुचाकीवर वीजेचा खांब कोसळल्याने पणजीत एक 16 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यासोबत असलेल्या तिच्या नातेवाईकालाही इजा झाल्याची माहिती आहे. पणजीतील अल्तिन्हो परिसरात गुरुवारी दुपारी घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

पणजीतील (Panjim) अल्तिन्होमध्ये वीज खात्याकडून वीजेच्या खांबावर दुरुस्तीचं काम सुरु होतं. मात्र यावेळी अचानक हा खांब कोसळून खाली आल्याने रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीवर पडला आणि या अपघातात (Accident) दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दोघांवरही उपचार सुरु असून सध्याची नेमकी स्थिती समजू शकलेली नाही.

दरम्यान मागच्याच महिन्यात ओल्ड गोवा (Old Goa) परिसरात माड कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. आताही दुचाकीवर वीजेचा खांब कोसळल्याने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेस कारणीभूत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणीही केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT