गोव्यात नवजात मुलगी सापडली बेवारस अवस्थेत

नेरुळमधील समुद्रकिनारी एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
baby
babyDainik Gomantak

नेरुळ: नेरुळमधील समुद्रकिनारी एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवजात अर्भक कापडात गुंडाळून समुद्रकिनारी पिशवीत ठेवले होते. (newborn girl was found unattended In Goa)

baby
Property Fraud: मालमत्ता फसवणूक प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

सायंकाळी सातच्या सुमारास नेरुळचे पंच संदीप त्यांच्या नियमित वेळेत फिरायला गेले होते, या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल (Football) खेळणाऱ्या काही मुलांनी त्याला सांगितले की त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज येत आहे. आणि त्यांनी आजूबाजूला शोधले असता त्यांना प्लास्टिकची पिशवी सापडल्याची माहिती नेरुळचे पंच संदीप यांनी दिली.

ते पूढे म्हणाले, माहिती मिळताच पर्वरी (Porvorim) पोलीस घटनास्थळी आले त्यानंतर मी पोलिसांच्या उपस्थितीत प्लास्टिकची पिशवी उघडली आणि त्यात नवजात मुलगी पाहून आम्हाला धक्का बसला,” नवजात बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी GMC रुग्णालयात नेण्यात आले असुन पोलिसांनी बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com